
आर्य चाणक्य हे त्यांच्या काळातील एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या जीवन काळात अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या आजही जीवन जगताना मार्गदर्शक ठरतात, व्यक्तींनी आपल्या आयुष्यात काय करावं? काय करू नये याबाबत चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, त्याला चाणक्य नीती नावानं ओळखं जातं, चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी आपल्या विचार विस्तृत पणे मांडले आहेत. आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये विद्यार्थ्यांसाठी काही नियम सांगीतले आहेत, चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये अशा काही सवयी सांगितल्या आहेत, ज्या सवयींचा विद्यार्थ्यांनी त्याग करायला हवा, अन्यथा त्यांना यश मिळणार नाही असं चाणक्य म्हणतात, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?
विद्यार्थ्याचा रागीट स्वभाव – आर्य चाणक्य म्हणतात जर एखाद्या विद्यार्थ्याला छोट्या-छोट्या गोष्टींवरून जर राग येत असेल तर त्याने ही सवय सोडून द्यायला पाहिजे, कारण जर तुमचा स्वभाव रागीट असेल तर आयुष्यात तुम्हाला यश मिळेलच याची कोणतीही खात्री नसते.
रहाणीमान – आर्य चाणक्य म्हणतात विद्यार्थी दशेमध्ये रहाणीमान हे खूप साध असावं, साधी रहाणीमान आणि उच्च विचारसरणी असावी, तरच तुम्हाला यश मिळू शकते, जर तुम्ही अभ्यासापेक्षा तुमच्या रहाणीमानावर जास्त वेळ खर्च करत असाल तर तुम्हाला शिक्षणात अपयश येणार.
कमी झोपा – चाणक्य म्हणतात विद्यार्थी दशेमध्ये झोपेचा त्याग करावा, कमीत कमी झोपावं आणि जास्तीत जास्त अभ्यास करावा, ज्याला झोप प्रिय आहे, असा व्यक्ती शिक्षणात कधीच यशस्वी ठरू शकत नाही.
लोभी होऊ नका – चाणक्य म्हणतात लोभ हा अत्यंत वाईट असतो, जो व्यक्ती लोभी असतो तो सहज आणि फार लवकर वाईट मार्गाला जाऊ शकतो, त्यामुळे जर शिक्षणात यशस्वी व्हायच असेल तर विद्यार्थ्यांनी लोभ सोडून द्यावा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)