Chanakya Niti : या चार सवयी आताच लावून घ्या, म्हातारपण आनंदात जाईल, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपलं म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे, आपल्या मुलांनी आपला म्हातारपणात चांगला सांभाळ केला पाहिजे, या वयात आपल्याला फार कष्ट नाही झाले पाहिजेत, त्यासाठी चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : या चार सवयी आताच लावून घ्या, म्हातारपण आनंदात जाईल, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
Chanakya Niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 27, 2026 | 8:51 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य म्हणतात माणूस आपल्या म्हातारपणात वयाच्या अशा टप्प्यावर असतो, जिथे आपण पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून असतो. आपल्या तरुण वयात आपल्या हातात संपूर्ण घराचा कारभार असतो, मात्र जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं हळुहळु आपल्याकडे जी घराची जबाबदारी असते, ती जबाबदारी आपली मुलं घेतात, आणि आपण मुलांवर अवलंबून राहू लागतो. तसेच म्हातारापणात अनेक आजारांचा देखील सामना करावा लागण्याची शक्यता असते. मुलं आपला सांभाळ व्यवस्थित करतील की नाही? याची देखील चिंता असते. जर आपल्याला आपलं म्हातारपण आनंदात आणि सुखा समाधानात घालवायचं असेल तर चाणक्य यांनी त्यासाठी काही उपाय सांगितले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

व्यायाम – चाणक्य म्हणतात जर तुमचं शरीर निरोगी असेल तर तुम्ही तुमच्या म्हातारपणाचा देखील जगण्याचा आनंद घेऊ शकता. कारण त्यावेळी तुमचं शरीर तुमची साथ देत असतं. त्यामुळे शरीराला म्हातारपणात निरोगी ठेवण्यासाठी तरुणपणाताच व्यायाम केला पाहिजे. शरीराला जपलं पाहिजे.

पैसा – चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात पैसा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. जर तुमच्याकडे म्हातारपणात पैसे असतील तर तुमची मुलं देखील तुमचा चांगला सांभाळ करतील, किंवा त्यांनी जर तुमचा सांभाळ केला नाही तर तुमच्याकडे असलेल्या पैशांच्या मदतीने तुम्ही तुमचं म्हातारपण आरामात व्यतीत करू शकता. त्यामुळे पैशांची बचत केली पाहिजे.

माणसं साभांळा – चाणक्य म्हणतात शेवटी आपल्या मदतीला माणसंच येतात, त्यामुळे कधीही कोणाला चुकीचं बोलू नका, अगदी म्हातारपणापर्यंत ही सवय टिकून ठेवली पाहिजे.

संतुलित आहार – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला तुमच्या म्हातारपणात निरोगी राहिचं असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात बदल करावेच लागतील. आहारावर नियंत्रण ठेवावं लागेल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Follow Us