
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी जे विचार मांडले, त्यामुळे आजही अनेकांना प्रेरणा मिळते. आर्य चाणक्य यांचे विचार आज अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये राजा कसा असावा? आदर्श राजाची लक्षणं काय आहेत? पती -पत्नीमधील नातं कसं असावं? शत्रू कसा ओळखावा? मित्र कोणाला म्हणावं? आयुष्य जगत असताना काय करावं? काय करू नये? अशा एकना अनेक विषयांवर चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये चर्चा केली आहे.
चाणक्य आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये म्हणतात जगात असे चार लोक आहेत, ज्यांच्यापासून तुम्ही चार हात दूरच राहिलं पाहिजे, त्यातच तुमचं हित आहे, अन्यथा तुमच्यावर पश्चतापाची वेळ येऊ शकते, जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं ते
चाणक्य म्हणतात जो व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेला आहे, अशा व्यक्तीपासून तुम्ही दूरच राहिलं पाहिजे, कारण तुमची जर अशा व्यक्तीसोबत मैत्री असेल तर तुम्ही देखील व्यसनाच्या विळख्यात सापडू शकता. त्यामुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर व्यसन लागलं तर तुमचा पैसा प्रचंड प्रमाणात व्यसनावर खर्च होतो, तुम्ही कर्जबाजारी होऊ शकतात.
चाणक्य पुढे म्हणतात की ज्या व्यक्तीला जुगारीचा नाद आहे, अशा व्यक्तीसोबत तुम्ही चूकनही राहू नका कारण जुगार हा एक असा दुर्गुण आहे, ज्यामुळे श्रीमतं देखील कंगाल होतात. त्यामुळे तुम्ही अशा लोकांपासून दूर राहण्यातच तुमचं हीत आहे.
बेरोजगार व्यक्ती – चाणक्य म्हणतात जी व्यक्ती बेरोजगार आहे, ज्या व्यक्तीला काम करण्याची इच्छा नाही अशा व्यक्तीपासून तुम्ही दूर राहिलेलं फायद्याचं आहे. कारण अशा व्यक्तीपासून भविष्यात तुम्हाला कोणतीही प्रेरणा मिळू शकत नाही.
नकारात्मक व्यक्ती – आर्य चाणक्य म्हणतात जो व्यक्ती सतत नकारात्मक विचार करतो अशा व्यक्तीपासून तुम्ही दूर राहा, कारण त्याच्या विचारांचा कुठे न कुठे तुमच्यावरही परिणाम होत असतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)