
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ, कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक विषयांवर चर्चा केली आहे. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगत असताना मार्गदर्शक ठरतो. व्यक्तीने आयुष्य जगत असताना कोणत्या चुका टाळाव्यात? काय करावं? काय करू नये? आदर्श राजा कसा असावा? त्याने प्रजेशी कसं वागावं? प्रजेचं कर्तव्य काय आहे? आपला खरा मित्र कसा ओळखावा, शत्रू कोणाला म्हणावं? आदर्श पत्नी कोणाला म्हणावं? आदर्श पत्नीची लक्षणं काय आहेत? पतीची कर्तव्य काय आहेत? अशा एकना अनेक विषयांवर आर्य चाणक्य यांनी आपल्या चानक्यनीती नावाच्या ग्रंथामध्ये मार्गदर्शन केलं आहे.
आर्य चाणक्य म्हणतात आई-वडील बनणं ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी जबाबदारी असते. आपल्या मुलांना त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी सक्षम बनवले, त्याच्यावर योग्य ते संस्कार करणे, वेळ प्रसंगी कठोर बनणे, तेवढंच मुलांवर प्रेम देखील करणं अशा अनेक भूमिका आई-वडिलांना एकाचवेळी कराव्या लागतात. मात्र हे सगळं करत असताना आई-विडिलांकडून काही चुका देखील होऊ शकतात, ज्यमुळे तुमच्या मुलाचं आयुष्य देखील बरबाद होऊ शकतं असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.
मुलांचे सर्वच हट्ट पूर्ण करू नका – आर्य चाणक्य म्हणतात तुम्ही मुलांचे सर्वच हट्ट पूर्ण करू नका, एखादी गोष्टी मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे त्यांना शिकू द्या, तुम्ही जर मुलांचे सर्व हट्ट पूर्ण केले तर ते संघर्ष करायला शिकणार नाहीत.
संगत तपासा – आपला मुलगा हा कोणाच्या संगतीमध्ये राहातो, यावर बारकाईने लक्ष ठेवा, कारण संगत ही एक अशी गोष्ट आहे, जी मुलांना घडवू देखील शकते आणि बिघडवू देखील शकते.
मुलांवर योग्य संस्कार करा – चाणक्य म्हणता मानवाच्या आयुष्यात संस्काराला खूप महत्त्व आहे. वेळीच जर योग्य संस्कार झाले तर तुमच्या मुलाचं आयुष्यच बदलून जाईल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)