
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, सोबतच ते कुटनीती तज्ज्ञ देखील होते. त्यांनी आपली बुद्धी आणि कुटनीतीच्या जोरावर धनानंद सारख्या बलाढ्य राजाचा पराभव केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला आहे. चाणक्य यांनी या ग्रंथमाध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात नेहमी सावध राहिलं पाहिजे, कोणत्याही प्रसंगाला आणि परिस्थितीला तोंड देण्याची तयारी असली पाहिजे. कारण कधी कोणती वेळ येते हे कोणीही सांगू शकत नाही. आपल्या घरामध्ये असे काही लोक असतात, ज्यांच्यासोबत राहणं म्हणजे साक्षात मृत्यूसोबत राहण्या समान असतं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल.
पर पुरुषावर प्रेम करणारी बायको – चाणक्य म्हणतात ज्या घरात नवरा जिवंत असताना देखील बायको एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते किंवा त्याच्या जाळ्यात अडकले अशी स्त्री त्या घरातील कुटुंबप्रमुखाच्या जीवाला सर्वात मोठा धोका असू शकते. कारण अनेकदा अशा स्त्रीमुळे कुटुंबप्रमुखावर आपला जीव गमावण्याची वेळ येते. अशा घरामध्ये कुटुंबप्रमुख पुरुषाला कुठलंही स्थान नसतं, त्यामुळे अशा महिलांपासून सावध राहण्याचा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
विश्वासघातकी मित्र – चाणक्य म्हणतात जिथे विश्वासघातकी मित्र असतो, तिथे फसवणूक अटळ असते, असे लोक आपल्या थोड्या फायद्यासाठी सुद्धा तुमचा जीव घेण्यास मागे पुढे पाहणार नाहीत, त्यामुळे असे मित्र वेळीच ओळखता आले पाहिजेत, त्यांच्यापासून सावध राहण्यातच तुमचं हीत आहे.
उद्धट नोकर – चाणक्य म्हणतात ज्या घऱातील नोकर उद्धट असतात, जे मालकाचं काम ऐकत नाहीत, छोट्या-छोट्या फायद्यासाठी मालकाची फसवणूक करू शकतात. अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. जर तुम्ही या तीन प्रकारच्या लोकांपासून सावध राहिले नाहीत तर एक दिवस तुमची मोठी फसवणूक होऊ शकते, मात्र त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)