Chanakya Niti : कोणतंही नात टिकवण्यासाठी या चार गोष्टी कायम लक्षात ठेवा, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये नातं टिकण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, याबद्दल देखील त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : कोणतंही नात टिकवण्यासाठी या चार गोष्टी कायम लक्षात ठेवा, चाणक्य काय सांगतात?
Chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 09, 2026 | 8:16 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील महत्त्वाच्या वाटतात. पती-पत्नीचं नातं कसं असावं? मैत्रीचं नातं कसं असावं? मुलाने आपल्या आई वडिलांचा सांभाळ कसा करावा? आई वडिलांनी मुलांवर कसे संस्कार करावेत? अशा एक ना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगून ठेवल्या आहेत. चाणक्य म्हणतात जर तुम्हाला कुठलंही नातं तुटू द्यायचं नसेल, ते नातं, तो व्यक्ती कायम आपल्या आयुष्यात राहावा असं वाटत असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्याग करायला शिकलं पाहिजे. ही एक अशी गोष्ट आहे, जी तुमच्या नात्याला अधिक बळकटी देते, असं चाणक्य म्हणतात. माणसाने आयुष्यात कायम चार गोष्टी लक्षात ठेवाव्यात, ज्यामुळे तुमचं नातं कायम टिकून राहील, असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

विश्वास – चाणक्य म्हणतात नातं कोणतंही असो, त्या प्रत्येक नात्याचा विश्वास हा कणा असतो. जर तुमचा एकमेकांवर विश्वास असेल तर तुमच्या नात्यामध्ये कधीही दुरावा येणार नाही. मग भलेही तुमचं नातं मैत्रीचं असो, पती-पत्नीचं असो अथवा भावाचं असो. जर तुमच्या नात्यामध्ये विश्वास असेल तर असं नातं कधीही तुटत नाही. ते अधिकाधिक बळकट होत जातं, असं चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हटलं आहे.

Loading...

संशय – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला तुमचं नातं महत्त्वाचं वाटत असेल आणि तुम्हाला ते कोणत्याही किमतीवर टिकून ठेवायचं असेल तर अशा नात्याबद्दल कधीही तुमच्या मनात संशय निर्माण होऊ देऊ नका, एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी तुमच्या मनात संशय आला, त्याच दिवसांपासून तुमचं नातं कमकुवत होण्यास सुरुवात झालीच म्हणून समजा.

अंहकार – चाणक्य म्हणतात नात्यामध्ये कधीही अंहकार नसावा, जिथे अंहकार असतो, तिथे नातं फार काळ टिकत नाही, त्यामुळे एकमेकांचा नेहमी आदर केला पाहिजे.

विचार – चाणक्य म्हणतात एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे विचार इतरांवर थोपवण्याचा प्रयत्न करू नका, या उलट समोच्या व्यक्तीचे विचार देखील ऐकून घ्या.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us