Chanakya Niti : या तीन गोष्टींना कायम घरापासून दूर ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला

आर्य चाणक्य हे एक मोठे अर्थतज्ज्ञ, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात अशा काही गोष्टी आहेत, ज्यांना कायम घरापासून दूर ठेवलं पाहिजे.

Chanakya Niti : या तीन गोष्टींना कायम घरापासून दूर ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
chanakya niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 29, 2026 | 9:58 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात या जगात अशा काही गोष्टी असात, ज्यांना कायम तुम्ही तुमच्या घरापासून दूर ठेवलं पाहिजे. एकदा जर या गोष्टींनी तुमच्या घरात प्रवेश केला तर असं घर उद्ध्वस्त होण्यासाठी फार वेळ लागत नाही. या गोष्टी अशा आहेत, त्यांनी जर एकदा तुमच्या घरात प्रवेश केला तर संपूर्ण घराचा विनाश हा निश्चित आहे. चला तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत.

संशय – चाणक्य म्हणतात संशय ही अशी गोष्ट आहे, जी संपूर्ण घराचा विनाश करते. पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर अवलंबून असतं. मात्र अनेकदा पतीला किंवा पत्नीला आपल्या जोडीदाराबद्दल विनाकारण संशय निर्माण होतो, ज्या दिवशी असा संशय निर्माण होतो, त्या दिवशी वैवाहिक जीवनाच्या पतनाला सुरुवात झाली असे समजावे, त्यामुळे संशयाला नेहमी घरापासून दरूच ठेवा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

Loading...

स्वार्थ – चाणक्य म्हणतात एखादं कुटुंब, कुटुंबातील लोक यांना जोडणारा पूल म्हणजे कुटुंब प्रमुखाचा निस्वार्थपणा असतो. त्यामुळे आपण आपल्या कुटुंबासाठी कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे काम करत राहिलं पाहिजे. जर तुम्ही नात्यांमध्ये स्वार्थ आणला तर तुमचं प्रचंड नुकसान होऊ शकतं, असा सल्ला देखील चाणक्य यांनी दिला आहे.

द्वेष -चाणक्य म्हणतात माणसाने कधीही कोणाचा द्वेष करू नये, हा निसर्ग नियम आहे, जे आपण समाजाला देतो, तेच आपल्याला परत मिळतं, त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही द्वेष करू नका असा सल्ला देखील चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये  दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us