Chanakya Niti : या माणसांची साथ आयुष्यात कधीच सोडू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य म्हणतात काही लोक हे आपल्या कर्माने तर काही लोक हे आपल्या नशीबाने तुमच्या आयुष्यात येत असतात. असे लोक तुमच्यासाठी खास असतात. यांची साथ सोडण्याची चूक आयुष्यात कधीही करू नका.

Chanakya Niti : या माणसांची साथ आयुष्यात कधीच सोडू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
CHANKYA
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 07, 2026 | 6:52 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचावंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात माणसाच्या आयुष्यात काही लोक हे त्याच्या कर्मामुळे येत असतात तर काही लोक नशीबाने येतात. परंतु हे लोक तुमच्यासाठी खास असतात, त्यांची साथ तुम्ही आयुष्यातही कधी सोडू नका. हे असे लोक असतात, ते तुमच्या आयुष्यात आल्यामुळे तुम्हाला जगण्याची एक नवी प्रेरणा मिळते, तुमच्या आयुष्याची दिशा बदलून जाते. जर असा एखादा व्यक्ती तुमच्या आयुष्यात आला आणि हे जर बदल तुमच्यामध्ये दिसून आले तर अशा व्यक्तीची साथ सोडण्याची कधीही चूक करू नका, अन्यथा तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

आई-वडील – चाणक्य म्हणतात तुमचे आई-वडील म्हणजे ईश्वराने तुम्हाला दिलेली सर्वात सुंदर अशी भेट आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आई-वडिलांची साथ आयुष्यात कधीही सोडू नका. जे मुलं म्हातारपणात आपल्या आई-वडिलांची साथ सोडते, अशा मुलाचं त्याच्या आयुष्यात कधीही चांगलं होऊ शकत नाही. मुलांच्या यशात त्यांच्या आई-वडिलांची भूमिका ही फार मोठी असते. त्यामुळे कधीही आपल्या आयुष्यात आई-वडिलांची साथ सोडू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

खरा मित्र – चाणक्य म्हणतात जे नशीबवान असतात, त्या आणि फक्त त्याच लोकांना खरा जीवाला जीव देणारा मित्र भेटतो. तुमच्या संकटाच्या काळात एकवेळ तुमचे नातेवाईक तुमची साथ सोडतील, परंतु तुमचा हा मित्र कधीही तुमची साथ सोडत नाही. त्यामुळे आयुष्यात कधीही तुमच्या अशा मित्रांची साथ सोडू नका.

गुरू – चाणक्य म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी गुरू हवाच, गुरुमुळेच तुमच्या आयुष्याचा उद्धार होतो. त्यामुळे एकदा एखादा व्यक्ती तुमचा गुरू झाला तर त्याची साथ आयुष्यभर सोडू नका, कारण त्याच्या मार्गदर्शनामुळेच तुमचं भलं होणार आहे. त्यामुळे कधीही गुरूची साथ सोडू नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us