AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : विषासमान असतात या 4 चुका, माणसाला हळुहळु मरणाकडे ढकलतात, चाणक्यांनी काय सांगितलं आहे?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की माणसाच्या काही सवयी अशा असतात ज्याची तुलना केवळ विषासोबतच होऊ शकते. या सवयी माणसाला हळुहळु मृत्यूकडे ढकलतात, त्यामुळे या सवयींचा त्याग करण्यातच तुमचं हीत आहे.

Chanakya Niti : विषासमान असतात या 4 चुका, माणसाला हळुहळु मरणाकडे ढकलतात, चाणक्यांनी काय सांगितलं आहे?
chanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 08, 2026 | 9:30 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की माणसाच्या अंगी अशा काही सवयी असतात ज्यांची तुलना केवळ विषासोबतच होऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीने विष प्राशन केलं तर त्याचा लगेचच मृत्यू होतो. परंतु माणसाच्या या सवयी हळुहळु परिणाम करणाऱ्या विषासमान आहेत. जर तुम्हाला या सवयी असतील तर तुमचा लगेचच मृत्यू होत नाही. मात्र या सवयी हळुहळु तुम्हाला मरणाच्या दाराकडे ढकलतात. या सवयींमुळे तुमचं भविष्यात फार मोठं नुकासन होतं. मात्र नुकसान होईपर्यंत तुमच्या ते लक्षात देखील येत नाही. मात्र जेव्हा तुम्ही सर्व काही गमावून बसतात, तेव्हा तुम्हाला पश्चताप होतो. त्यामुळे तुम्हाला देखील या सवयी असतील तर या गोष्टींपासून तुम्ही आजच दूर झालं पाहिजे, अन्यथा भविष्यात तुमचं फार मोठं नुकसान होईल, असा इशारा चाणक्य यांनी दिला आहे, चला तर मग जाणुन घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आळस – चाणक्य म्हणतात आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. दुसऱ्या कोणत्याच सवयीमुळे तुमचं जेवढं नुकसान होत नाही, तेवढं नुकसान आळसामुळे होतं. जेव्हा तुमच्या अंगात आळस असतो, तेव्हा तुम्ही काम टाळतात. आज महत्त्वाचं असलेलं काम तुम्ही उद्यावर ढकलतात. त्यामुळे तुमचं भविष्यात फार मोठं नुकसान होतं. लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान देखील होऊ शकतं, त्यामुळे मानसाने आपल्या कामात कधीही आळस करू नये, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

काम टाळण्याची सवय – चाणक्य म्हणतात या जगात कष्टाला पर्याय नाही, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळवायचं असेल तर तुम्हाला कष्ट करावेच लागणार आहे. जर तुम्ही काम टाळत असाल तर ही सवय तुम्हाला घातक ठरू शकते. त्यामुळ कधीही आपली जबाबदारी टाळू नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

रागाच्या भरात निर्णय – चाणक्य म्हणतात अनेक लोकांना अशी सवय असते की ते रागाच्या भरात लगेच तडका फडकी निर्णय घेऊन टाकतात. मात्र अशा गोष्टींमुळे भविष्यात हे लोक अडचणीत येतात. त्यामुळे कोणताही निर्णय हा कधीही रागाच्या भरात घेऊ नका. आधी त्यावर शांत डोक्याने विचार करा आणि मगच निर्णय घ्या.

कर्ज – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीला कर्ज घेण्याची सवय असते, असा व्यक्ती मोठ्या संकटात सापडू शकतो. कर्ज घेताना आपल्याला कर्ज कोणत्या कामासाठी लागत आहे? आणि आपण ते कर्ज फेडू शकतो का? याचा विचार करूनच कर्ज घ्या असं चाणक्य म्हणतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा