Chanakya Niti : या कामांचा शेवट नेहमी वाईटच होतो, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आपल्याला आयुष्यात योग्य वाटेवर चालण्यासाठी मार्गदर्शन करतात. आज आपण चाणक्यांच्या अशाच काही विचारांबद्दल जाणून घेणार आहोत.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना योग्य वाटेवर चालण्याची प्रेरणा देतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात आयुष्यात अशा काही गोष्टी आहेत, ज्या तु्म्हाला यश मिळवण्याचा सोपा मार्ग वाटू शकतात. त्या वाटेनं जाऊन तुम्ही कदाचित झटपट यश देखील मिळू शकतात. परंतु अशा गोष्टींचा शेवट हा नेहमी वाईट आणि वेदनादायी असतो. त्यामुळे तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते. त्यामुळे अशा गोष्टींचा तुम्हाला कितीही मोह झाला तरी देखील या गोष्टींच्या कधीही वाटेला जाऊ नये. कष्ट आणि संयम याच दोन गोष्टी अशा आहेत, ज्या तुम्हाला चिरंतर टिकणाऱ्या यशाकडे घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे आयुष्यात कष्टाशिवाय पर्याय नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. परंतु काही लोक हे कष्ट टाळून आयुष्यात यश मिळू इच्छितात, त्यांना त्यांच्या आयुष्यात नेहमी अपयशच हाती लागतं, त्यामुळे काही गोष्टी या टाळल्या पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
फसवणूक – चाणक्य म्हणतात आयुष्यात तुम्ही कोणाचीही कधीही फसवणूक करू नका, तुम्ही एखाद्याची फसवणूक करत असाल तर भविष्यात तुमची देखील फसवणूक होणारच आहे. तसेच जर तुमची फसवणूक पकडली गेली तर समोरच्या व्यक्तीचा तुमच्यावरील विश्वास कमी होतो. त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकतात. त्यामुळे तुम्ही कोणतंही काम करत असाल तर ते प्रामाणिकपणे करा असा सल्ला चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे.
दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा – चाणक्य म्हणतात कधीही दुसर्याच्या धनाची अपेक्षा ठेवू नका, स्वत: कष्ट करा आणि तुम्हाला हवे तेवढे पैसे कमवा. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या धनावर नजर ठेवता, फसवणूक करून किंवा कपटी नीतीने ते धन मिळवण्याचा प्रयत्न करता, तेव्हा यामध्ये निश्चितपणे तुमचा पराभव होतो. आणि समजा ते धन तुम्हाला मिळालं तरी ते फार काळ तुमच्याकडे टिकत नाही, असं धन हे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी नेहमी नुकसानदायकच असतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
राग – चाणक्य म्हणतात राग हा माणसाचं नेहमी नुकसानच करतो. कारण तुम्हाला जेव्हा राग येतो, तेव्हा तुम्ही तुमच्यावरील नियंत्रण गमावलेलं असतं. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही जर एखादा मोठा निर्णय घेतला तर त्यामुळे आयुष्यभर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते. त्यामुळे रागात स्वत:वर नियंत्रण ठेवायला शिका असा सल्ला चाणक्य यांनी दिला.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)