Chanakya Niti: हे तीनच माणसाचे खरे मित्र, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. ते आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाच्या आयुष्यात अनेक मित्र असतात, परंतु तीन गोष्टी अशा असतात केवळ तेच आपले खरे मित्र असतात, जर तुमच्याकडे या तीन गोष्टी असतील तर तुम्ही कोणत्याही संकटावर सहज मात करू शकतात.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रथांमध्ये चाणक्य म्हणतात की या जगात मित्रा इतकं दुसरं सुंदर नातं कोणतं नाही. मित्र जीवाला जीव देऊ शकतात. जिथे तुमचे नातेवाईक मदत करत नाहीत, तिथे तुमचे मित्र तुमच्या मदतीला धावून येतात. परंतु जर तुमचे मित्र हे स्वार्थी असतील तर त्यांच्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकतात. मात्र या जगात अशा तीन गोष्टी आहेत, त्या जर तुमच्याकडे असतील तर या जगात तुम्ही सर्वात श्रीमंत व्यक्ती असतात. या तीन गोष्टीच तुमचे खरे मित्र आहेत असं समजावं, ज्या माणसाकडे या तीन गोष्टी आहेत, तो माणूस कुठल्याही संकटावर सहज मात करू शकतो, संकटावर मात करू शकतो म्हणण्यापेक्षा अशा माणसाच्या आयुष्यातील जवळपास अर्धी संकट तर येण्यापूर्वीच नष्ट होतात. चला तर मग या तीन गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? आणि आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
बचत केलाला पैसा – चाणक्य म्हणतात पैसा हाच माणसाचा खरा मित्र असतो, जर तुमच्याकडे पैसा असेल तर लोक तुम्हाला मान -सन्मान देतात. तुम्ही तुमच्याकडे असलेल्या पैशांच्या जोरावर कुठल्याही संकटातून सहज बाहेर पडू शकतात. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी पैसाच असतो. त्यामुळे तुम्ही जे काही पैसा कमावता, त्यातील थोडे पैसे बचत केले पाहिजेत. कारण तुम्ही बचत केलेला पैसाच हा संकट काळातील तुमचा खरा मित्र असतो.
जोडलेले गेलेले लोक – चाणक्य म्हणतात शक्यतो कोणाचंही मन दुखवू नये, आयुष्यात माणसं जोडावीत. जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते, तेव्हा हीच लोक मदतीसाठी तुमच्यासोबत उभी राहतात, त्यामुळे अशी जोडली गेलेली लोकच ही तुमची खरी संपत्ती असते. जे तुम्हाला वाईट काळात मदत करतात, आणि त्यातून बाहेर पडण्यास मदत करतात.
आरोग्य – चाणक्य म्हणतात तुमच्याकडे केवळ पैसा असून चालत नाही, तर तुमचं आरोग्य देखील उत्तम असावं लागतं. ज्या व्यक्तीचं आरोग्य उत्तम असतं, तो जगातील सर्वात सुखी व्यक्ती असतो. आरोग्य हाच तुमचा खरा मित्र आहे. त्यामुळे माणसाने नेहमी आपलं आरोग्य उत्तम ठेवलं पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)