AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शीर नव्हते, हातही नव्हते, कुजलेल्या अवस्थेत धड सापडले, पोलिसांनी असा सोडवला गुंता…

आजूबाजूच्या परिसरातील कुत्री भूंकत होते आणि वाऱ्याबरोबर प्रचंड दुर्गंधी सुटली होती. इतकी की सहन करण्यापलिकडची...पोलिस घटनास्थळी पोहचले तर त्यांना धक्काच बसला..शीर आणि हात दोन्ही गायब असलेले धडच शिल्लक होते....

शीर नव्हते, हातही नव्हते, कुजलेल्या अवस्थेत धड सापडले, पोलिसांनी असा सोडवला गुंता...
crime scene
| Updated on: Jul 16, 2026 | 8:07 PM
Share

मुंब्रा येथील खर्डी गावाजवळील निर्जन परिसरात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. या मृताचे शीर आणि दोन्ही हात जागेवर नव्हते. मृतदेहाचे शीर आणि दोन्ही हात धडापासून वेगळे करण्यात आल्याने पोलिसांसमोर मृताची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान होते पोलिसांना हा मृतदेह पाहून त्याचे शीर आणि हात शोधण्यासाठी सगळा परिसर पिंजून काढला. मात्र, अखेर पोलिसांना यश मिळाले आणि या प्रकरणातील सत्य उघडकीस आले आहे.

ठाण्यातील मुंब्रा येथे मैत्रीचे नाते रक्तरंजित वैरात बदलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छोटी मोठी चोरी आणि गुन्हेगारी करणारे तिघा मित्रांमध्ये अचानक भांडण झाले. त्यांनी आपल्या मित्राचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

एका तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करून त्याचे शीर आणि दोन्ही हात धडापासून वेगळे करण्यात आल्याने ठाणे शहरात खळबळ उडाली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने या सनसनाटी हत्येचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून, मृताचे शीर आणि हत्येत वापरलेले शस्त्र शोधण्याचे काम सुरू केले आहे. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,खर्डी गावाजवळील निर्जन परिसरात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता.मृतदेहाचे शीर आणि दोन्ही हात धडापासून वेगळे करण्यात आल्याने पोलिसांसमोर मृताची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान होते.तपासादरम्यान फैज सुलतान मलिक आणि अल्बान सुलतान मलिक या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपलाच मित्र अमन मुस्कीन शेख याची हत्या केल्याची कबुली दिली.

पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १३ मार्च रोजी रात्री मुंब्रा येथील श्रीलंका परिसरात झालेल्या वादानंतर आरोपींनी अमनला रिक्षामधून निर्जन ठिकाणी नेले. तेथे धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून हत्या केली. त्यानंतर मृताची ओळख लपवण्यासाठी त्याचे शीर आणि दोन्ही हात वेगळे करून मृतदेह जंगलात फेकून दिला.या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. आरोपींनी संपूर्ण हत्याकांडाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवला होता. पोलिसांनी तो मोबाईल जप्त केला असून, व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मुख्य आरोपी फैज सुलतान मलिक याच्यावर यापूर्वीही खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर मृत अमन शेख याच्यावरही दुचाकी चोरीचा गुन्हा नोंद होता. सध्या पोलिसांकडून मृताचे शीर आणि हत्येत वापरलेले शस्त्र शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ठाणे पोलिस उपायुक्त ( गुन्हे शाखा ) अमरसिंह जाधव यांनी सांगितले.

Follow Us
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?