Chanakya Niti : हे लोक तुमचा विश्वासघात करणार म्हणजे करणार, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की समजात असे काही लोक असतात, जे तुमची फसवणूक करणार म्हणजे करणार, त्यांच्यापासून कायम सावध राहावं.

Chanakya Niti : हे लोक तुमचा विश्वासघात करणार म्हणजे करणार, चाणक्य काय सांगतात?
CHANAKYA
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 04, 2026 | 9:00 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात या समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. समाजात सर्वच लोक चांगले नसतात, अर्थात सर्वच लोक वाईट देखील नसतात. म्हणूनच तुम्ही माणसं ओळखायला शिकलं पाहिजे, या समाजात असे काही लोक आहेत, त्यांना तुम्ही कितीही जीव लावा, त्यांच्यावर विश्वास ठेवा, परंतु ते तुम्हाला धोका देणार म्हणजे देणारच. अशावेळी तुमच्यावर पश्चतापाची वेळ येऊ शकते, त्यामुळे तुम्ही माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आळशी नोकर – चाणक्य म्हणतात तुमच्या घरात जर एखादा आळशी नोकर असेल तर त्याच्यापासून तुम्ही नेहमी सावध राहिलं पाहिजे. असा नोकर कधीही मालकाच्या हिताचा विचार करत नाही, किंवा अशा नोकरामुळे मालकाचं कधीही भलं होऊ शकत नाही. असा नोकर काम टाळण्याचे हजारो बाहाणे शोधतो, त्यामुळे तुमचं नुकसान होतं. अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे.

स्वार्थी मित्र – चाणक्य म्हणतात या जगात मित्रा इतकं जवळचं नातं दुसरं कोणतंच नाही. ज्यावेळी तुम्हाला तुमचे नातेवाईक मदत करत नाही, तेव्हा तुमचा मित्र तुमच्या मदतीला धावून येतो. परंतु असे देखील काही लोक असतात, तुमच्या सोबत मैत्री केल्यामुळे त्यांना फायदा होणार असतो, तो फायदा पाहूनच ते तुमच्याशी मैत्री करतात, जेव्हा त्यांचा स्वार्थ साधला जातो, तेव्हा असे लोक तुमच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकण्यासाठी देखील मागे पुढे पहात नाहीत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

कपटी लोक – चाणक्य म्हणतात ज्यांच्या मनात कपट असतं, असे लोक तुम्हाला धोका देऊ शकतात. असे लोक नेहमी धोकेदायक असतात, अशा लोकांना वेळीच ओळखणं गरजेचं असतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us