Chanakya Niti : घरातील कलहाची मुळ कारणं कोणती? पहा चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहे, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात अशी काही कारणं असतात, ज्यामुळे तुमच्या घरात सातत्याने वाद निर्माण होतो.

Chanakya Niti : घरातील कलहाची मुळ कारणं कोणती? पहा चाणक्य काय सांगतात?
CHANAKYA
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 27, 2026 | 9:53 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाच ग्रंथ लिहिला आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आदर्श कुटुंब कसं असावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात कुटुंब ही संस्था विश्वासावर आधारलेली असते, जेव्हा या विश्वासाला तडा जातो, तेव्हा त्या घरात कुटुंब कधीच एकत्र राहु शकत नाही. त्यामुळे हा विश्वास जपणं त्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. या सर्वांमध्ये कुटुंबप्रमुखाची भूमिका महत्त्वाची असते. तसेच चाणक्य पुढे असेही म्हणतात की सन्मान ही गोष्टी देखील विश्वासा इतकीच महत्त्वाची आहे. घरातील प्रत्येक सदस्यांची अशी इच्छा असते की आपल्याला घरात योग्य तो सन्मान मिळेल, परंतु जर घरातील एखाद्या व्यक्तीला कुटुंबात सन्मान मिळत नसेल. त्याच्यासोबत दुजाभाव होत असेल तर अशा कुटुंबात देखील सतत भांडणं सुरू असतात. अशा काही गोष्टी आहेत, ज्यामुळे तुमचं कुटुंब फार काळ एकत्र राहु शकत नाही, कुटुंब विभागलं जातं, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

चाणक्य म्हणतात जोपर्यंत कुटुंबात आपण, आपलेपणाची भावना असते, तोपर्यंत तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना कोणीही वेगळं करू शकणार नाही, तसेच अशा घरात कधीही भांडणं, गृहकलह उद्भवणार नाही. परंतु जेव्हा ही आपण आणि आपलेपणाची भावना जाऊन मीपणाची भावना एखाद्या व्यक्तीच्या मनात निर्माण होते, अशा कुटुंबामध्ये कधीही सुख, शांती राहत नाही. अशा घरात सतत कलह होत राहतो. कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना दोष देऊ लागतात. परिणामी असं कुटुंब बाहेरून जरी एकत्र दिसत असलं तरी आतून मात्र तुटलेलं असतं, त्यामुळे नेहमी आपलेपणाची भावना जपली पाहिजे, आपलेपणाची भावना नष्ट होणं हेच कुटुंबातील कलाहाचं मुळ कारण आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

चाणक्य पुढे असंही म्हणतात जेव्हा कुटुंबातील व्यक्ती एकमेकांकडे दुर्लक्ष करू लागतात, एकमेकांच्या असण्याची दखल घेत नाहीत, अशा घरात देखील सतत भांडणं होत राहतात, कुटुंबातील व्यक्तीची मनं अस्वस्थ होतात, त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींकडे लक्ष देणं गरजेचं असतं, असंही चाणक्य यांनी म्हटलं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us