Chanakya Niti : माणसाच्या आयुष्यातील 3 सर्वात मोठे दोष कोणते? चाणक्य म्हणतात दुर्लक्ष कराल तर करावा लागेल पश्चाताप
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात असा एकही माणूस तुम्हाला सापडणार नाही, ज्याच्यामध्ये दोष नाही, परंतु काही दोष असे असतात जे माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतात.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये माणसाने आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात माणसाने आयुष्य जगत असताना काही मर्यादा या पाळल्याच पाहिजेत, जर तुम्ही मर्यादांचं पालन केलं नाही तर एक दिवस तुमची ही वर्तणूक तुमच्या विनाशास कारणीभूत ठरते, माणूस म्हटलं की दोष आलेच तुम्हाला या जगात असा एकही माणूस सापडणार नाही, ज्याच्यामध्ये दोष नाही, परंतु असे काही दोष असतात, जे तुमच्या विनाशास कारणीभूत ठरतात. हे जर दोष तुमच्यामध्ये असतील तर या जगातील कोणताच माणूस तुमची मदत करू शकणार नाही, त्यामुळे असे दोष वेळीच दूर केले पाहिजेत, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
अभिमान – चाणक्य म्हणतात प्रत्येक माणसाला स्वाभिमान हवाच परंतु अभिमान असता कामा नये. काही लोकांच्या ठिकाणी अशी वृत्ती असते की हे काम फक्त मीच करू शकतो, किंवा मी होतो म्हणून ते काम झालं. मला कोणाचीच गरज नाही. मात्र माझी सर्वांना गरज आहे, असं जेव्हा एखादा माणूस समजू लागतो, तेव्हा ती त्याच्या पतनाची सुरुवात असते, त्यामुळे माणसाने कधीही गर्व करू नये, माणसाने नेहमी नम्र राहावं असं चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हटलं आहे.
अज्ञान – चाणक्य म्हणतात अज्ञानी असणं हा जगातील सर्वात मोठा दोष आहे. हा दोष जर तुमच्यात असेल तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. समाजात तुम्हाला कधीही मान-सन्मान मिळत नाही. तुमची फसवणूक होते. त्यामुळे तुम्ही ज्ञान हे मिळवलच पाहिजे, या जगात ज्ञानी लोकांचा नेहमीच आदर केला जातो.
लोभ – चाणक्य म्हणतात माणसात असलेला तिसरा आणि महत्त्वाचा महादोष म्हणजे लोभीपण, जेव्हा एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीचा लोभ होतो, तेव्हा तो माणूस ती गोष्ट मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, त्यामुळे माणसाने कधीही लोभी नसावं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)