
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही आपल्याला उपयोगी ठरतात. चाणक्य हे एक कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यामुळे त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मानवाचे शत्रू किती प्रकारचे असतात, कोणत्या शत्रूपासून सर्वाधिक सावध राहिलं पाहिजे, शत्रूवर विजय कसा मिळवायचा, याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात तुमची जसजशी प्रगती होते, तसतसे तुमचे शत्रू देखील वाढत जातात. कारण समाजात असे अनेक लोक असतात, जे तुमचं चांगलं झालेलं कधीच पाहू शकत नाहीत. त्यामुळे आपल्याला असे लोक ओळखता आले पाहिजेत, आपण अशा लोकांपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे. असे लोक कधीही आपला घात करू शकतात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये शत्रूचे दोन प्रकार सांगितले आहेत. चाणक्य म्हणतात माणसाचे दोन शत्रू असतात एक गुप्त शत्रू असतात आणि दुसरे उघड शत्रू असतात. गुप्त शत्रू हे उघड शत्रूपेक्षा खूप खतरनाक असतात. कारण उघड शत्रू जे असतात त्यांच्यापासून आपण सावध राहू शकतो, आपल्याविरोधात ते जर काही कारस्थान करत असतील तर त्यावर आपलं लक्ष असतं, मात्र गुप्त शत्रूचं तसं नसतं, गुप्त शत्रू हे नेहमी तुमच्या आजूबाजूलाच असतात, ते सतत आम्ही तुमचे सर्वात मोठे हितचिंतक आहोत असं तुम्हाला भासवण्याचा प्रयत्न करतात. पण मनातून कायम ते तुमच्यावर जळत असतात. असे लोक फारच कपटी असतात. जेव्हा त्यांना संधी मिळते, तेव्हा ते तुमचा नुकसान करतात असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.
माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण?
चाणक्य म्हणतात माणसाचा सर्वात मोठा शत्रू हा भूक आहे, भूक तुम्हाला काहीही करायला लावू शकते. रिकाम्यापोटी माणूस कोणतंही कार्य करू शकत नाही. त्यामुळे भूक हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्या माणसाला भूक असते, असा माणूस वेळप्रसंगी एखादा आपराध करायला देखील मागे -पुढे पहात नाही, त्यामुळे भूक हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)