Chanakya Niti : चाणक्यांचे हे विचार तुमचं आयुष्यच बदलून टाकतील, निराशा झटक्यात होईल दूर
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टींमुळे आजही अनेकांना प्रेरणा मिळते, आयुष्य जगण्यासाठी एक नवं बळ प्राप्त होतं, असेच काही विचार आज आपण पहाणार आहोत.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य यांनी त्या काळात त्यांना जे अनुभव आले, ते सर्व अनुभव आणि कोणत्या परिस्थितीमध्ये व्यक्तीचं वर्तन कसं असावं? याबद्दल अनेक गोष्टी त्यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवल्या आहेत. चाणक्य यांचा हा ग्रंथ म्हणजे माणवानं आदर्श जीवन कसं जगावं? काय करावं आणि काय करू नये, याचं थोडक्यात सार आहे. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये असे अनेक विचार लिहून ठेवले आहेत, ज्यामुळे अनेकांना आजही प्रेरणा मिळते. जसं की चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये संयमाचा सल्ला देतात, चाणक्य म्हणतात ज्याच्याकडे संयम आहे, त्या व्यक्तीचा कोणीच पराभव करू शकत नाही, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.
या गोष्टी तुमचं आयुष्य उद्ध्वस करतात – चाणक्य म्हणता वाईट संगतं, अति हाव, अति उतावळेपणा, आळस या अशा गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला आयुष्यातून उठवतात. जर एखाद्या माणसाला वाईट संगत असेल तर त्याच्या आयुष्याचं वाटोळं झालचं म्हणून समजा. कधी-कधी तर त्याची मृत्यूशी देखील गाठ पडू शकते. पुढे चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीला अति हाव असते, असा व्यक्ती देखील आपल्या स्वत:चाच शत्रू बनतो, तो स्वत:च्या फायद्यासाठी आंधळा होतो, त्यामुळे त्याचं आयुष्यात प्रचंड नुकसान होतं. आळस हा देखील माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, आळसामुळे माणूस काम करत नाही, अशा परिस्थितीमध्ये तो इतरांवर अवलंबू राहू लागतो, त्यामुळे त्याला कोणंही कामाचं कौशल्य प्राप्त होत नाही, आणि त्यामुळे आयुष्यात त्याचं सर्वात जास्त नुकसान होतं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
या गोष्टींपासून कायम दूर रहा – चाणक्य म्हणतात अंहकार, यशासाठी शॉटकट, अज्ञानातून निर्णय घेणं अशा गोष्टीपासून कायम दूर राहिलं पाहिजे, कारण यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. चाणक्य म्हणतात अंहकारी माणसं त्यांच्या हाताने त्यांचं नुकसान करू घेतात, तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल पुरेशी माहिती असेल तेव्हा त्याबद्दल निर्णय घ्या, तसेच यशासाठी कधीही शॉटकट नसतो, हे लक्षात ठेवा तुम्हाला जर यश हवं असेल तर कष्ट करावेच लागतील, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)