
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांना आपल्या जीवनात जे अनुभव आले, ते अनुभव चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये सांगितले आहेत, तसेच कोणत्या परिस्थितीमध्ये माणसाचं वर्तन कसं असावं? याबद्दल देखील चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांचे हे विचार आजही अनेकांसाठी मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात आपल्याला दोन प्रकारचे लोक भेटतात, एक चांगल्या स्वभावाचे लोक असतात, जे नेहमी दुसर्यांच्या भल्याचा विचार करतात. तर दुसरीकडे असे देखील लोक असतात जे दुसऱ्याला जास्तीत जास्त त्रास कसा होईल, याचाच सतत विचार करत असतात, त्यांना त्यामधून आनंद मिळतो, मात्र हा आनंद क्षणिक असतो. परंतु तुम्ही जर अशा लोकांचं अनुकरण केलं तर तुम्ही देखील मोठ्या संकटात सापडू शकता. त्यामुळे पाच प्रकारच्या लोकांचं अनुकरण कधीच करू नये.
स्वार्थी लोक – आर्य चाणक्य म्हणतात स्वार्थी लोकांचं अनुकरण कधीच करू नका, जे स्वार्थी लोक असतात, ते नेहमी आपल्या फायद्याच्याच गोष्टी पहात असतात, आणि एक दिवस असा येतो की ते मोठ्या संकटात सापडतात. तुम्ही जर अशा लोकांचं अनुकरण केलं तर तुम्ही देखील एक दिवस मोठ्या संकटात सापडू शकता.
अंहकारी लोक – ज्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीचा जसं की पैसा, ताकद अशा कोणत्याही गोष्टीचा गर्व झाला असेल तर तुम्ही चुकूनही अशा लोकांचं अनुकरण करू नका, कारण या गोष्टी माणसाजवळ फार काळ टिकत नाही, मात्र तुमच्या अंहकारामुळे तुमच्याजवळ असलेली माणसं तुमच्यापासून दुरावली जातात, त्यामुळे अशा लोकांचं अनुकरण करू नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
आळशी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक काही कामधंदा करत नाहीत, नुसते बसून असतात. अशा लोकांचं अनुकरण करू नका, त्यामुळे तुम्ही एक दिवस संकटात सापडाल.
अप्रामाणिक लोक – चाणक्य म्हणतात जे लोक आपल्या कामाप्रती प्रामाणिक नसतात, अशा लोकांचं अनुकरण कधीही करू नये, त्यामुळे तुम्ही संकटात सापडाल, लोकांचा तुमच्यावर असलेला विश्वास कमी होईल. समाजामध्ये तुमची किंमत राहणार नाही.
असत्य बोलणारे लोक- चाणक्य म्हणतात ज्या लोकांना खोटं बोलण्याची सवय असते, अशा लोकांचं देखील कधीच अनुकरण करू नये.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)