Moon Transit: शनीच्या राशीत चंद्राचे गोचर ठरणार खास, 14 नोव्हेंबरपासून 7 राशींचे सुखाचे दिवस सुरू होणार
Chandra Gochar: १४ नोव्हेंबरला चंद्र शनीच्या मकर राशीत प्रवेश करणार असून, या गोचराचा ७ राशींवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. या काळात काही राशींच्या लोकांना करिअर, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक आयुष्यात शुभ परिणाम मिळतील. जाणून घेऊया, कोणत्या आहेत या राशी.

वैदिक ज्योतिषशास्त्रात चंद्राला मन, भावना आणि मानसिक शांततेचा कारक मानले जाते. चंद्र साधारणपणे दर अडीच दिवसांनी राशी बदलतो. पंचांगानुसार, १४ नोव्हेंबर २०२६ रोजी चंद्र शनीची रास असलेल्या मकर राशीत प्रवेश करणार असून, १७ नोव्हेंबरपर्यंत याच राशीत राहील. शनीच्या राशीतील चंद्राचे हे गोचर काही राशींसाठी विशेष लाभदायक ठरेल. या काळात काही लोकांना करिअरमध्ये नवीन संधी, आर्थिक लाभ आणि कौटुंबिक जीवनात आनंद मिळण्याचे संकेत आहेत. जाणून घेऊया, चंद्राच्या या गोचरामुळे कोणत्या ७ राशींना शुभ परिणाम मिळू शकतात.
मेष
नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळेल. वरिष्ठांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामातील अडथळे दूर होऊन महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक बाबतीतही फायदा होण्याचे संकेत आहे. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळतील.
वृषभ
धार्मिक आणि सामाजिक कार्यांमध्ये आवड वाढेल. लांबच्या प्रवासाचे योग आहेत. या प्रवासातून लाभ होईल. व्यवसाय करणाऱ्यांना यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जवळच्या व्यक्तींसोबत चांगला वेळ घालवता येईल.
कर्क
वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात आनंद येईल. जोडीदारासोबतचे नाते अधिक चांगले होईल. एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. मानसिक तणाव कमी होऊन आरोग्यही चांगले राहिल. कामाच्या ठिकाणी एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते. एखादी आनंदाची बातमी मिळेल.
तूळ
कौटुंबिक जीवनातील काही अडचणी दूर होतील. मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असल्यास हा काळ अनुकूल ठरू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.
वृश्चिक
आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल. भावंडांकडून सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना कामाचा विस्तार करण्यासाठी नवीन संधी मिळेल. एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडू शकतात.
मकर
आर्थिक स्थिती सुधारेल. आत्मविश्वासात वाढ होईल. व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी होईल. वैयक्तिक योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी चांगल्या संधी मिळेल. गुंतवणुकीसाठी अनुकूल पर्याय समोर येऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. आधीच्या स्रोतांमधून पैसे मिळण्याचे संकेत आहेत.
मीन
उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मानसिक शांतता आणि समाधान अनुभवता येईल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सुधारू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना एखादी चांगली व्यावसायिक डील मिळण्याचे संकेत आहेत.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)