Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहणादरम्यान या गोष्टी दान करा, नोकरी, संतान प्राप्ती आणि आर्थिक समस्या होईल दूर

| Updated on: May 26, 2021 | 4:22 PM

वर्ष 2021 चे पहिले चंद्रग्रहण आज 26 मे रोजी होणार आहे (Chandra Grahan 2021). हे पूर्ण चंद्रग्रहण आहे, परंतु भारतातील काही भागात ते थोड्या काळासाठी आंशिक दिसू शकते.

Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहणादरम्यान या गोष्टी दान करा, नोकरी, संतान प्राप्ती आणि आर्थिक समस्या होईल दूर
chandra-grahan
Follow us on

मुंबई : वर्ष 2021 चे पहिले चंद्रग्रहण आज 26 मे रोजी होणार आहे (Chandra Grahan 2021). हे पूर्ण चंद्रग्रहण आहे, परंतु भारतातील काही भागात ते थोड्या काळासाठी आंशिक दिसू शकते. चंद्रग्रहण दुपारी 2 वाजून 7 मिनिटांनी प्रारंभ होईल आणि संध्याकाळी 7 वाजून 19 मिनिटांपर्यंत असेल. त्याचवेळी, त्याचा आंशिक टप्पा दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी सुरु होईल आणि संध्याकाळी 6 वाजून 23 मिनिटांपर्यंत असेल. हे ग्रहण वृश्चिक राशी आणि अनुराधा नक्षत्रात असेल (Chandra Grahan 2021 Know The Timings And Importance Of Daan During Lunar Eclipse).

हे ग्रहण उपछाया ग्रहण असले. ज्योतिषाचार्य डॉ. अरविंद मिश्रा यांच्या मते, उपछाया ग्रहण असल्यामुळे सुतक मान्य होणार नाही. त्यामुळे ना मंदिरे बंद राहातील, ना कोणतेही काम थांबविण्यात येईल. ज्योतिषांच्या मते, ग्रहण कुठल्याही प्रकारचे असेल, तरी त्याचा नक्कीच काही ना काही परिणाम होतो. म्हणून, ग्रहण काळात दान करणे आणि मानसिक ध्यान करणे हे सर्वांच्या भविष्यासाठी शुभ असेल.

दानाचे महत्त्व समजून घ्या

ज्योतिषाचार्य यांच्या मते धार्मिक ग्रहण काळात दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर करते. तुमच्या आयुष्यात पैसा, संपत्ती, नोकरी किंवा मूल इत्यादींशी संबंधित काही समस्या असल्यास या काळात तुम्ही काही खास गोष्टी दान करा. याचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल. ग्रहण काळात दान देण्यात येणाऱ्या वस्तुला बाजूला ठेवा. ग्रहण पूर्ण झाल्यावर किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी स्नानानंतर गरजू व्यक्तीला ती वस्तू द्या.

नोकरीच्या समस्येसाठी

आपण किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्याला नोकरीच्या समस्येला तोंड द्यावं लागत असल्यास पांढरे मोती किंवा पांढर्‍या मोत्याने बनविलेले दागिने दान करा.

आजारपणातून मुक्त होण्यासाठी

जर कुटुंबातील एखादी व्यक्ती बर्‍याच दिवसांपासून आजारी असेल तर ग्रहण काळात चांदीचे नाणे एका काचेच्या भांड्यात टाका आणि त्यात पाणी भरा. आजारी व्यक्ती पाण्यात आपला चेहरा पाहावे आणि ग्रहणानंतर त्या नाण्याला भांड्यासह दान करा.

आर्थिक समस्या सोडविण्यासाठी

तांदूळ आणि दूध हे समृद्धीचे सूचक मानले जातात. ग्रहण काळात तुम्ही तांदूळ, दूध किंवा त्यांच्यापासून बनविलेले काहीही दान करावे. त्याद्वारे नारायण आणि लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात.

नकारात्मकता दूर करण्यासाठी

घरात जर त्रास कायम राहिला असेल तर ग्रहण काळात साखर दान करा. यामुळे घराची नकारात्मकता दूर होते. याशिवाय पांढरी वस्त्रे दान केल्याने घरात शुभता येते.

संतान प्राप्तीसाठी

तुमच्या आयुष्यात संतानची कमतरता असल्यास ग्रहण काळात गरजू मुलाला दूध, खेळणी आणि कपड्यांचे दान द्या.

Chandra Grahan 2021 Know The Timings And Importance Of Daan During Lunar Eclipse

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहणावेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय करु नये? जाणून घ्या

Lunar Eclipse 2021 : आज वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण, भारतात कुठे दिसेल, ग्रहणाची वेळ काय? जाणून घ्या