
७ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेला वर्षाचे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण लागणार असून जे भारतातूनही दिसणार आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण ( खंग्रास ) असून ३ तास २८ मिनिटे ते चालणार आहे. हे ग्रहण कुंभ राशी आणि पूर्वभाद्रपद नक्षत्रात लागणार आहे. खगोलशास्रानुसार चंद्रग्रहण पृथ्वीची स्थितीमुळे होते. पृथ्वी जेव्हा सुर्य आणि चंद्राच्या दरम्यान येते आणि सुर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहचण्यास रोखते, तेव्हा चंद्रग्रहण लागते. चला तर पाहूयात वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहणाचा देश आणि जगाच्या भौगोलिक स्थितीवर कसा प्रभाव होणार आहे.
ज्योतिषशास्रानुसार राजकुमार शास्री यांच्या मते पौर्णिमा तिथीवर चंद्रग्रहण लागत असते आणि ते ज्योतिष नजरेतून खूपच महत्वाचे असते. पौर्णिमा तिथीला राहू – चंद्राचा योग ग्रहण स्थितीला निर्माण करतो. जसा तो सुर्य सिद्धांत देखील वर्णन केलेला आहे. जेव्हा अशा ग्रहांची स्थिती निर्माण होते तेव्हा नैसर्गिक संकटांची शक्यता प्रबळ होते.
चंद्रग्रहणाने पाण्याच्या लोढ्यांचा सर्वाधिक प्रकोप असतो. कारण चंद्र जल कारक असतो. त्यामुळे पुर, अतिवृष्टीचे संकट अधिक पाहायला मिळते. पर्वतमय प्रदेशात याचा विशेष प्रकोप पाहायला मिळत असतो.कारण चंद्र हा वनस्पतींचाही स्वामी आहे. त्यामुळे पर्वतमय प्रांतात मोठ्या नैसर्गिक दुर्घटना घडतात.
या नैसर्गिक संकटाचा प्रभाव जनमानस आणि पशूंवर देखील पाहायला मिळतो. समाजाची स्थिती धोक्यात येते. अलिकडेच आपण जम्म-कश्मीरत पुर आणि भूस्खलन पाहीले. याशिवाय वैष्णोदेवीत पूर आणि भूस्खलनाची घटना पाहायला मिळाली. धरालीत ढगफुटीने पुरजन्य स्थिती निर्माण झाली. नंतर अतिवृष्टीने पंजाब सारखे शहर बुडाल्याचे आपण पाहिले आहे.
७ सप्टेंबरला लागणारे चंग्रग्रहण शतभिषा नक्षत्राच्या अंतिम चरण आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या प्रथम चरणात लागत आहे. ज्या लोकांचा शतभिषा नक्षत्रात जन्म झाला आहे आणि ज्यांची चंद्राची महादशा चालू आहे वा पूर्वभाद्रपद नक्षत्राच्या प्रथम चरणात ज्यांचा जन्म झाला आहे. त्यांना सर्वाधिक सावध रहावे लागणार आहे.
चंद्र ग्रहणता सूतक काळ ९ तांसाआधी म्हणजे ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.५७ वाजता सुरु होईल, धार्मिक मान्यतेनुसार सुतककाळात जेवणे, झोपणे आणि पूजाअर्चा करणे वर्जित मानले गेले आहे. परंतू ग्रहण दरम्यान ईश्वराचा मंत्र जाप करणे खूपच लाभदायक सिद्ध होतो.
भारतीय वेळेनुसार ७ सप्टेंबर रोजी वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण रात्री ९.५८ मिनिटांनी सुरु होईल. त्याची समापन ८ सप्टेंबरच्या मध्यरात्री १.२६ वाजता होईल. ज्योतिषांच्या मते ७ सप्टेंबरला दिसणारे चंद्रग्रहण एकदम लालबुंद दिसेल, ज्याला ब्लड मून (Blood Moon ) नावाने ओळखले जाते.
चंद्रग्रहणाचा पहिला स्पर्श रात्री ८.५९ वाजता होईल आणि ग्रहणाचा अंतिम स्पर्श रात्री २.२४ मिनिटांनी होईल.म्हणजे संपूर्ण ग्रहण काळाचा एकूण अवधी ३ तास २८ मिनिटांचा असेल. जर चंद्रग्रहणाचा महत्वपूर्ण टप्पा आणि पिक टायमिंगचा विचार करता तो रात्री ११.४२ वाजता असेल.