Devuthani Ekadashi 2021 | प्रबोधिनी एकादशी कधी साजरी होते, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व

दिवाळीनंतर प्रबोधिनी एकादशी साजरी केली जाते. हिंदू धर्मात प्रबोधिनी एकादशी विशेष महत्त्व आहे. या वर्षी 14 नोव्हेंबर 2021 रोजी प्रबोधिनी एकादशी आहे. या दिवसापासून लग्न, गृहप्रवेश, आदी सर्व कामे सुरू होतात.

Devuthani Ekadashi 2021 | प्रबोधिनी एकादशी कधी साजरी होते, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व
dev-uthaan
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 7:55 AM

मुंबई : दिवाळीनंतर प्रबोधिनी एकादशी साजरी केली जाते. हिंदू धर्मात प्रबोधिनी एकादशी विशेष महत्त्व आहे. या वर्षी 14 नोव्हेंबर 2021 रोजी प्रबोधिनी एकादशी आहे. या दिवसापासून लग्न, गृहप्रवेश, आदी सर्व कामे सुरू होतात. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवंताला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील पाळले जाते.या एकादशी तिथीने श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या महिन्यांचा समावेश असलेला चातुर्मास कालावधी संपतो. असे मानले जाते की शयनी एकादशीला भगवान विष्णू झोपतात आणि या दिवशी जागे होतात. त्यामुळे तिला देवूठाण किंवा प्रबोधिनी म्हणतात.

प्रबोधिनी एकादशी शुभ मुहूर्त
एकादशी तारीख 14 नोव्हेंबर 2021 – सकाळी 05:48 वाजता सुरू होईल
एकादशी तारीख 15 नोव्हेंबर 2021 – सकाळी 06:39 वाजता समाप्त होईल

देवउठनी एकादशी महत्व Dev Uthani Ekadashi Importance

सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. या एकादशी व्रताचे वर्णन महाभारताच्या कथेतही आढळते. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले होते. यानंतर युधिष्ठिराने एकादशीचे व्रत विधिवत पूर्ण केले. एकादशीचे हे व्रत पूर्ण केल्यानंतर  पापांपासून मुक्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात.एकादशीचे व्रत श्रद्धेने पाळल्यास त्याचे सर्व अशुभ संस्कार नष्ट होऊन मोक्षप्राप्ती होते, असे म्हणतात.

तुळशी पूजन

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुळशीमातेचा भगवान शालिग्रामशी आध्यात्मिक विवाहही याच दिवशी होतो. लोक घरांमध्ये आणि मंदिरात हे विवाह करतात.या दिवशी तुळशीच्या पूजेचे महत्त्व आहे. शालिग्राम आणि तुळशीच्या पूजेने पितृदोष नाहीसा होतो.

विष्णुपूजा

या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. जर तुम्ही या दिवशी कोणतीही पूजा न करता फक्त “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” या मंत्राचा जप केला तर तुम्हाला लाभ होतो.

चंद्रदोष दूर होतो

ज्यांच्या कुंडलीत चंद्र कमजोर आहे, त्यांनी निर्जल एकादशीला जल आणि फळे खाऊन व्रत करावे. यामुळे चंद्र देवता प्रसन्न होते, तसेच चंद्र सुधारल्यानंतर त्यांची मानसिक स्थितीही सुधारते.

उसाचे महत्त्व

या दिवशी रात्री घरोघरी तांदळाच्या पिठाचा चौकोनी तुकडा बनवून उसाची पूजा केली जाते. असे म्हणतात की ज्या घरात ही पूजा केली जाते, त्या घरावर भगवान विष्णूची कृपा राहते.

इतर बातम्या : 

Akshay Navami 2021| आवळा नवमी म्हणजे काय? आवळा नवमी कधी असते, जाणून घ्या व्रताची विधी आणि कथा

Chhath Puja 2021 | सुखी संसारासाठी, मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आज सूर्याला वाहिला जाणार अर्घ्य

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी कधीही विसरु नका, आयुष्यातील अडचणी सहज दूर होतील