Dhantrayodashi 2026: यंदाची धनत्रयोदशी ठरणार खास! शुक्र प्रदोषाचा शुभ संयोग, खरेदी आणि पूजेचे मुहूर्त जाणून घ्या

Shukra Pradosh: यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी शुक्र प्रदोषाचा शुभ योग जुळून आला आहे. या खास दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजेचे आणि सोने-चांदीसह इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी कोणता मुहूर्त शुभ आहे, जाणून घ्या.

Dhantrayodashi 2026: यंदाची धनत्रयोदशी ठरणार खास! शुक्र प्रदोषाचा शुभ संयोग, खरेदी आणि पूजेचे मुहूर्त जाणून घ्या
Dhantrayodashi 2026
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Nov 04, 2026 | 7:26 PM

धनत्रयोदशीचा सण शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे. यंदाच्या धनत्रयोदशीला शुक्र प्रदोषाचा विशेष संयोग जुळून आला आहे. तसेच शुक्रवार हा दिवस देवी महालक्ष्मीला समर्पित असल्याने या योगाला धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा आणि खरेदीसाठी प्रदोष काळ अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सोने-चांदी, दागिने तसेच नवीन वस्तूंची खरेदी करण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर देवी लक्ष्मी, भगवान कुबेर आणि धन्वंतरी यांची विधिवत पूजा केली जाते. त्यामुळे यंदा धनत्रयोदशीला शुक्र प्रदोषाचा शुभ योग कधी आहे, लक्ष्मी-कुबेर पूजेचा मुहूर्त कोणता आणि खरेदीसाठी कोणती वेळ उत्तम आहे, हे जाणून घेऊया.

शुभ संयोग

यंदा ६ नोव्हेंबर रोजी शुक्रवार असल्याने धनत्रयोदशीला शुक्र प्रदोषाचा योग जुळून आला आहे. शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो. त्यामुळे या दिवशी लक्ष्मी, कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे.

Loading...

पूजेचा शुभ मुहूर्त

धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळात पूजा करणे शुभ मानले जाते. यंदा संध्याकाळी 5 वाजून 49 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 23 मिनिटांपर्यंत प्रदोष काळ असणार आहे. या काळात लक्ष्मी, कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा करता येईल.

– खरेदीचा शुभ मुहूर्त

धनत्रयोदशीला खरेदी करण्यासाठी तीन शुभ वेळा सांगण्यात आल्या आहेत.
• शुभ चौघडिया मुहूर्त – सकाळी 8:16 ते 9:48
• अभिजित मुहूर्त – सकाळी 11:48 ते दुपारी 12:56
• प्रदोष काळ – संध्याकाळी 5:49 ते रात्री 8:23

काय खरेदी करावे?

धनत्रयोदशीला सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. देवी लक्ष्मीच्या सुवर्ण आणि चांदीशी संबंधित स्वरूपामुळे या दिवशी मौल्यवान धातूंचे दागिने खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र, प्रत्येकाला सोने-चांदी खरेदी करणे शक्य नसते. अशा वेळी आपल्या बजेटनुसार पितळ किंवा तांब्याची भांडी खरेदी करू शकता. याशिवाय लाह्या आणि अख्खे धणे खरेदी करणेही शुभ मानले जाते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us