
आपण आपल्या घरी किंवा बाल्कनीत विविध रोपं लावतं असतो. त्यातील एक पवित्र रोप म्हणजे तुळशीचं. पण हे बऱ्याच जणांना माहित नसेल की तुळशीच्या रोपासोबत काही रोपं लावणे अशुभ मानले जाते. तुळशीजवळ काही रोपे लावणे वास्तुशास्त्रात चांगले मानले जात नाही. वास्तुनुसार तुळशीजवळ कोणती रोपे लावू नयेत हे जाणून घ्या.
काटेरी रोप
तुळशीजवळ कॅक्टस किंवा गुलाबासारखे काटेरी झाडे लावू नयेत. असे म्हटले जाते की काटेरी झाडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, ज्यामुळे तुळशीच्या सकारात्मक उर्जेवर परिणाम होऊ शकतो. वास्तुनुसार, काटेरी झाडे घराची शांती भंग करू शकतात.
दाट आणि मोठे रोप
तुळस कधीही वड, पिंपळ किंवा इतर कोणतेही मोठ्या वृक्षाच्या सानिध्यात लावू नये. या वनस्पतींची सावली तुळशीवर पडणे अशुभ मानले जाते. तुळशी नेहमी अशा ठिकाणी ठेवावी जिथे पुरेसा प्रकाश आणि हवा असेल.
वाळलेली वनस्पती
तुळशीच्या झाडाजवळ कधीही वाळलेले रोप लावू नका. असे म्हटले जाते की असे केल्याने नकारात्मकता वाढते. असे म्हटले जाते की वाळलेल्या वनस्पतींमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते, ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतात.
कडू फळे देणारी झाडे
वास्तुशास्त्रानुसार, तुळशीजवळ कारले किंवा कडुलिंब इत्यादी कडू फळ देणारी रोपे लावू नयेत. असे म्हटले जाते की ही झाडे तुळशीच्या सकारात्मक उर्जेला नुकसान करतात आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात.
जास्त पाण्याची गरज असलेली झाडे
वास्तुशास्त्रानुसार, तुळशीजवळ जास्त पाण्याची आवश्यकता असलेली झाडे लावणे टाळावे. जास्त पाणी तुळशीसाठी चांगले नाही. अशा परिस्थितीत, जर तुळशीजवळ जास्त पाण्याची आवश्यकता असलेली झाडे असतील तर तुळशीचे झाड नष्ट होऊ शकते.
ज्या वनस्पतींमधून दुधाळ द्रव पदार्थ बाहेर पडतो
वास्तुशास्त्रानुसार, ज्या वनस्पतींमधून दुधाळ पांढरा द्रव बाहेर पडतो अशी रोपं तुळशीच्या रोपाजवळ लावू नये. यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)