AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळजाचा ठोका चुकला, हृदयाची धडधड वाढली… तर प्रेतांचा खचच पडला असता, एक चूक आणि… नंदूरबारच्या बाजारात काय घडलं?

नंदूरबारच्या विसरवाडी बाजारात मुलांच्या खोडसाळपणामुळे मधमाशांनी अचानक हल्ला केला. यामुळे बाजारात मोठी घबराट पसरली आणि लोक जीव मुठीत घेऊन पळाले. या हल्ल्यात ५-७ जण जखमी झाले, तर एका दिव्यांग महिलेला ३०-३५ डंख लागल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे. चंद्रपुरातही पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

काळजाचा ठोका चुकला, हृदयाची धडधड वाढली... तर प्रेतांचा खचच पडला असता, एक चूक आणि... नंदूरबारच्या बाजारात काय घडलं?
| Updated on: Mar 16, 2026 | 1:30 PM
Share

नंदूरबारच्या नवापूरमधील विसवाडी बाजारपेठेत मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. लहान मुलांच्या खोडसाळपणामुळे पोळ्यावरून माशा उठल्या. त्यामुळे लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. जो तो जीवमूठीत घेऊन पळत सुटला. त्यातही 5 ते 7 लोकांना माशांना चावा घेतल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका अपंग महिलेला तर मधमाशांनी 30 ते 35 डंख मारल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे. अचानक घडलेल्या या प्रकाराने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बाजारात असंख्य लोक बाजार करण्यासाठी आले होते. वेळीच हा प्रकार लक्षात आला नसता तर बाजारात मृतांचा सडा पडला असता, अशी प्रतिक्रिया स्थानिक व्यक्त करत आहेत.

नंदूरबारच्या विसरवाडी येथील गजबजलेल्या बाजारपेठेत आज अचानक मधमाशांच्या हल्ल्याने एकच खळबळ उडाली. बाजारपेठेजवळील एका इमारतीवरील पोळ्यावर काही मुलांनी दगड मारल्याने संतप्त झालेल्या मधमाशांच्या थव्याने नागरिकांवर हल्ला चढवला. या घटनेत पाच ते सात जणांना मधमाशांनी चावा घेतला असून एका अपंग महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी महिलेला तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्या शरीरातील सुमारे 30 ते 35 डंख काढून उपचार करण्यात आले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे काही काळ विसरवाडी बाजारपेठेत भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

अन् पळापळ सुरू झाली

अचानक मधमाशा घोंघावत आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. जो तो मिळेल त्या दिशेने पळत सुटला. मधमाशांचा थवाच अंगावर येऊ लागल्याने दुकानदारांनी तात्काळ दुकाने बंद केले. काही ग्राहकांनी बंद दुकानात आसरा घेऊन कसाबसा जीव वाचवला. तर ज्यांनी जमिनीवरच दुकान मांडलं होतं, त्यांनी दुकाने आणि पैशाचा गल्ला तसाच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. संपूर्ण बाजारात पळापळ सुरू होती. सैरभैर वातावरण सुरू होतं. मधमाशांच्या हल्ल्याने विसरवाडी बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंद्रपुरात पर्यटक जखमी

नंदूरबारपाठोपाठ चंद्रपुरातही मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या सात बहिणी डोंगरावर मधमाशांनी हल्ला केल्याने शंकरपूर येथिल पाच पर्यटक जखमी झाले. हे पर्यटक लहान मुलाचा नवस फेडण्यासाठी आले होते. मात्र दुपारी अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने सर्व सैरावैरा पळू लागले. हा दगडी रस्ता असल्यामुळे सुरक्षित पोचणे कठिण होत होते. मधमाश्यांच्या हल्ल्यात सर्वच जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि स्वाब संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी पोचले. जखमीना उपचारासाठी गोविंदपूर आणि तळोधी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सात बहिणी डोंगरांवर मधमाशांनी हल्ला करण्याच्या घटना सातत्याने होत आहेत. पर्यटकांची वर्दळ नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे

Follow Us
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान