
भारतीय संस्कृतीत, झाडू हा केवळ घरातील साफसफाई करण्यासाठी,स्वच्छ करण्यासाठी असतो. पण हे देखील तेवढेच खरे आहे की झाडूमुळे देखील घरातील ऊर्जेवर परिणाम होऊ शकतो. वास्तुशास्त्रात झाडूला फार महत्त्व आहे. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. ही घर स्वच्छ करण्यासाठी दररोज वापरली जाणारी एक सामान्य वस्तू आहे, परंतु बहुतेकदा त्याच्या योग्य स्थानाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आर्थिक संकटे ओढावण्याची शक्यता असते.
वास्तुशास्त्रानुसार झाडू योग्य ठिकाणी ठेवणे का महत्त्वाचे?
वास्तुशास्त्रात, झाडू केवळ स्वच्छता साधन म्हणून नव्हे तर सुव्यवस्था आणि सकारात्मक वातावरणाचे प्रतीक म्हणून देखील पाहिला जातो. असे मानले जाते की जिथे स्वच्छता राखली जाते, तिथे वातावरण चांगले आरोग्य चांगले असते आणि लक्ष्मीचा विशेष आशीर्वादही मिळतो. वास्तुशास्त्रानुसार, झाडू योग्य ठिकाणी ठेवणे केवळ घराच्या उर्जेसाठीच नाही तर सुव्यवस्था राखण्याच्या सवयीसाठी देखील फायदेशीर आहे.
वास्तुशास्त्रात झाडूचे महत्त्व : वास्तुशास्त्र सांगते की घराची व्यवस्था ही त्याच्या वातावरणाची गुरुकिल्ली आहे. झाडू चुकीच्या दिशेने ठेवल्यास, चुकीच्या जागी ठेवल्याने देखील त्याचा विपरीत परिणाम घरात जाणवतात.
झाडू कुठे ठेवू नये?
झाडू ठेवण्याचा उद्देश घर स्वच्छ दिसणे हा आहे, म्हणून झाडू अशा ठिकाणी ठेवणे टाळावे जिथे ते लक्ष वेधून घेते किंवा घर अस्वच्छ दिसते.
तसेच झाडू घरात चालण्याच्या मार्गात येणार नाही, गोंधळ निर्माण करणार नाही अशा ठिकाणी ठेवणे टाळावे.
मुख्य दरवाज्याजवळ झाडू ठेवणे अशुभ मानले जात.
झाडू खोलीच्या मध्यभागी किंवा रस्त्यात ठेवू नये. अन्यथा त्याला वारंवार पाय लागण्याची शक्यता असते.
स्वयंपाकघरात झाडू उघडा ठेवल्याने स्वच्छतेचा समन्वय बिघडतो.
रात्री झाडू बाहेर किंवा खोलीत उघडा ठेवल्याने घराच्या शिस्तीवरही परिणाम होतो.
झाडू ठेवण्यासाठी योग्य जागा अन् दिशा कोणती?
झाडू नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे तो व्यवस्थित आणि नजरेआड राहील.
घरातील स्टोअररूम, कोपरा किंवा बंद कपाट यासारख्या जागा झाडू ठेवण्यासाठी चांगल्या मानल्या जातात.
झाडू उभा ठेवण्याऐवजी तो एका बाजूला झुकलेला किंवा सरळ ठेवणे चांगले.
झाडू वापरल्यानंतर, तो स्वच्छ करून त्याच्या जागी ठेवावा.
तसेच झाडू कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)