दिवाळीत या 3 गोष्टी नक्की दान करा, देवी लक्ष्मीची कृपा नक्की होईल

दिवाळी हा सण दिव्यांचा, प्रकाशाचा सण आहे. पण दिवाळीत दानधर्माला विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीची कृपा आणि समृद्धीसाठी काही वस्तू दान करणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक स्थैर्य लाभते. त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या नक्कीच दान केल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात.

दिवाळीत या 3 गोष्टी नक्की दान करा, देवी लक्ष्मीची कृपा नक्की होईल
Donate these 3 things on Diwali
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2025 | 2:01 PM

दिवाळी हा प्रकाश आणि आनंदाचा सण आहे. हिंदू मान्यतेनुसार, पूजा आणि प्रार्थनांसोबतच, दिवाळीला दान करण्याचेही विशेष महत्त्व असते. दिवाळीतील कोणत्याही एक दिवस ठरवून या वस्तू दान करू शकता. त्यामुळे आपल्यावर लक्ष्मीची कृपा राहिल. पण त्या कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या दान केल्या पाहिजेत. चला जाणून घेऊयात दिवाळीत कोणत्या वस्तू दान करणे शुभ मानले जाते ते जाणून घ्या.

कार्तिक अमावस्येपासून दिवाळी सुरु होते. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून दिवाळी हा एक अतिशय खास दिवस मानला जातो. दिवाळीत लक्ष्मी देवीच्या पूजेची सगळेजणच जय्यत तयारी करत आहेत. पण यासोबतच काही अशा वस्तू आहेत ज्या दान केल्यानेही लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. तसेच सकारात्मक ऊर्जा ,आनंद ,समृद्धी मिळते. याव्यतिरिक्त, देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आर्थिक स्थिरता प्राप्त होते.

अन्नदान करणे : हिंदू धर्मात अन्नदान करणे हे एक श्रेष्ठ दान मानले जाते. अन्नदान केल्याने देवी लक्ष्मी तसेच देवी अन्नपूर्णा प्रसन्न होतात असे मानले जाते. दिवाळीच्या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्नदान करावे. त्यात कोणतेही पदार्थ तुम्ही दान करू शकता. किंवा दिवाळीचा फराळाची पाकिटे बनवूनही तुम्ही ती पाकिटं दान करू शकता.

कपडे दान करणे : हिंदू धर्मात कपडे दान करणे अत्यंत शुभ आणि फायदेशीर मानले जाते. कपडे दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते असे मानले जाते.

सौंदर्यप्रसाधने : दिवाळीला विवाहित महिलांना सौंदर्यप्रसाधने दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. सौंदर्यप्रसाधने दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यांना शाश्वत सौभाग्य मिळते असे मानले जाते.

दिवाळीत काय दान करू नये

दिवाळीत अशाही काही वस्तू आहेत ज्या कधीही दान करू नयेत. दिवाळीत साखर दान करू नका. तसेच दिवाळीत दूध, दही, सुया आणि मीठ देखील दान करणे टाळावे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)