AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंपाषष्ठीच्या दिवशी करा ‘या’ वस्तूंचे दान, विद्यार्थ्यांना होईल मोठा लाभ

स्कंद षष्ठीच्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने कार्तिकेय प्रसन्न होतात आणि सर्व वाईट गोष्टी दूर होतात. आयुष्यात कधीही संकटांचा सामना करावा लागत नाही.

चंपाषष्ठीच्या दिवशी करा 'या' वस्तूंचे दान, विद्यार्थ्यांना होईल मोठा लाभ
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 8:29 PM
Share

हिंदू धर्मात स्कंद षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी हा सण भगवान कार्तिकी याला समर्पित आहे. कार्तिकेय हा महादेव आणि देवी पार्वती चा मोठा मुलगा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्लपक्षातील षष्ठी तिथीला स्कंद षष्ठी हा सण साजरा केला जातो. कार्तिकेला युद्धाचा देवता मानला जाते. अशी मान्यता आहे की या दिवशी कार्तिकेयची पूजा केल्याने आपल्या शत्रूंवर विजय प्राप्त होतो. कार्तिकेय हा बुद्धीचाही देवता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या दिवशी कार्तिकेची पूजा करणे शुभ मानले जाते. अपत्य प्राप्तीसाठी देखील या दिवशी कार्तिकेची पूजा केली जाते. या दिवशी कार्तिकेयची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते.

पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील स्कंद षष्ठीची तिथी सहा डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी 12:7 वाजता सुरू आहे. शनिवारी सात डिसेंबर रोजी सकाळी 11: 5 वाजता समाप्त होईल.

शुभ योग

सर्वार्थ सिद्धी योग – 6:30 ते 5:18 रवि योग – दुसऱ्या दिवशी सकाळी 5.18 ते 6.31 पर्यंत

स्कंद षष्ठी पूजा विधि

स्कंद षष्ठीच्या दिवशी शास्त्रानुसार कार्तिकेयची पूजा केली जाते. कार्तिकेयची आई वडील महादेव आणि पार्वती यांची या दिवशी पूजा करावी. कार्तिकेयला फळ, फुले, मिठाई, धुप, दिवे, अर्पण करावे. मंत्राचा जप करा : ‘ओम स्कंदाय नमः’, ‘ओम षदानाय नमः’, ‘ओम शर्वणभवाय नमः’. कार्तिकेयची आरती करा आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ अर्पण करा.

‘या’ वस्तूंचे दान करा

फळे: फळांचे दान केल्याने आरोग्य लाभते आणि देव प्रसन्न होतात. दूध: दूध दान केल्याने ज्ञान आणि बुद्धी वाढते. दही: दही दान केल्याने आयुष्य आणि आरोग्य वाढते. धान्य: गरिबांना धान्य दान केल्याने अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळतो. कपडे: गरिबांना कपडे दान केल्याने पुण्य मिळते. पुस्तके: पुस्तके दान केल्याने ज्ञानाचा प्रसार होतो.

‘या’ गोष्टी विसरू नका

शुद्ध भावनेने दान करा: दान करताना मनात कोणत्याही प्रकारचा अहंकार नसावा. गरजूंना दान करा: दान नेहमी गरजू लोकांनाच केले पाहिजे. देणगी देताना हसा: दान देताना हसा आणि घेणाऱ्यांचे आभार माना.

स्कंद षष्ठीचा इतिहास

कथेनुसार तारकासुर राक्षसाने देवतांना खूप त्रास दिला. या त्रासाला कंटाळून देवतांनी महादेव आणि पार्वतीची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून कर्तिकियेचा जन्म झाला आणि त्याने तारका सुराचा वध करून देवांना मुक्त केले. या विजयाची आठवण म्हणून देवतांनी स्कंद षष्ठीचा उत्सव साजरा करण्याची सुरुवात केली. स्कंद षष्ठीचा उत्सव लोकांना कार्तिकेयच्या शौर्य, बुद्धिमत्ता आणि दयाळू पणावर विश्वास ठेवण्यास प्रेरित करतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त.
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका.
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ.
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील.
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?.
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?.
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक...
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर.....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर......
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र.
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार..
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार...