Chanakya Niti : फक्त पैसा बघू नका, मुलीसाठी वर निवडताना आई – वडिलांनी या गोष्टी लक्षात ठेवाच

Chanakya Niti : लग्न करणं हा कोणत्या बाहुला - बाहुलीचा खेळ मुळीच नाही, लग्न म्हणजे एक जबाबदारी असते. म्हणून आयुष्यात येणारी व्यक्ती कशी असली पाहिजे हे पाहूनच लग्न करणं योग्य आहे. तर आई - वडिलांनी देखील मुलीसाठी वर निवडताना फक्त पैसा नाही तर ती व्यक्ती कशी आहे, हे देखील पाहिलं पाहिजे.

Chanakya Niti : फक्त पैसा बघू नका, मुलीसाठी वर निवडताना आई - वडिलांनी या गोष्टी लक्षात ठेवाच
| Updated on: Nov 14, 2026 | 1:45 PM

Chanakya Niti : लग्न म्हणजे मुलगा आणि मुलीच्या आयुष्यातील फार मोठा टप्पा असतो. अशात आयुष्यात येणारी व्यक्ती आपल्याला समजून घेणारी आहे की नाही हे पाहणं देखील फार महत्त्वाचं आहे. अशात मुलीचं लग्न करताना आई – वडिलांनी सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. मुलीसाठी वर शोधताना पालक मुलाचे शिक्षण, नोकरी, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि आर्थिक स्थिती तपासतात . पण अनेक पालक आपल्या मुलीसाठी निवडलेल्या मुलाचे गुण तपासायला विसरतात. ही एक छोटीशी चूक त्यांच्या मुलीचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करू शकतं आणि सध्या आपल्या भोवती अशा अनेक घटना घडत आहेत. म्हणूनच, आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे की, मुलीसाठी वर निवडताना पालकांनी पैसा किंवा मालमत्ता नव्हे, तर त्याच्यामध्ये हे गुण आहेत का हे तपासावे. चाणक्यांनी सांगितल्याप्रमाणे, मुलीसाठी वर शोधताना पालकांनी कोणते गुण तपासावेत हे जाणून घ्या.

आपल्या मुलीसाठी जोडीदार शोधताना, त्या मुलाची धर्मावर श्रद्धा आहे की नाही याकडे विशेष लक्ष द्या. चाणक्य नीतीनुसार, जे लोक धर्मावर विश्वास ठेवत नाहीत ते आपले कुटुंब व्यवस्थित सांभाळू शकत नाहीत. चाणक्यांता असा विश्वास आहे की, पुरुषांनी धर्मावर श्रद्धा ठेवली पाहिजे, तरच ते एक सुखी आणि यशस्वी कुटुंब निर्माण करू शकतात.

Loading...

सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर नैतिकतेच्या मार्गाचंअनुसरण करतो की नाही, हे पाहणं महत्त्वाचं आहे. जो व्यक्ती आपली जबाबदारी समजतो आणि नैतिक मूल्यांचं पालन करतो, तो आपल्या कुटुंबाला कधीही हानी पोहोचवू शकत नाही. असे लोक चुकीचं कृत्य करणं किंवा चुकीच्या मार्गावर जाणं टाळतात. आपल्या मुलीचं लग्न अशा व्यक्तीशी लावणं तिच्या भविष्यासाठी खूप चांगलं ठरेल.

पुरुषाने कष्टाळू असलं पाहिजे. आचार्य चाणक्यांच्या मते, जो पुरुष आयुष्यातील ध्येये साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतो, तो यशस्वी होतो. असे पुरुष हे सुनिश्चित करतात की लग्नानंतर त्यांच्या पत्नीला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये. अशा पुरुषांना समाजात आणि कुटुंबात प्रचंड आदर मिळतो.

आपल्या मुलीच्या लग्नाचा निर्णय केवळ एखाद्या व्यक्तीचा सध्याचा चांगला पगार, गाडी, बंगला किंवा संपत्ती यावर आधारित ठेवणं योग्य नाही. पैसा आणि प्रतिष्ठा आज असेल तर उद्या नसेल, पण व्यक्तीचे विचार आणि गुण कायम त्याच्यासोबत राहतात. त्यामुळे, केवळ संपत्तीवर निर्णय घेण्याऐवजी, पालकांनी मुलाचं चारित्र्य आणि स्वभाव विचारात घ्यावा. जेव्हा पालक मुलाची मेहनत, निष्ठा आणि चांगल्या मूल्यांना प्राधान्य देतात, तेव्हा त्यांची मुलगी आनंदी जीवन जगू शकेल.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणं हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us