Dr. Babasaheb Aambedkar Quote : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडवणारे अनमोल विचार

Mahaparinirvan Din 2023, Dr BR Ambedkar Quotes in Marathi महापरिनिर्वाण दिनाच्या निमीत्त्याने आपण बाबासाहेबांचे जीवनात बदल घडवणारे काही काही विचार जाणून घेऊया. हे विचार जीवनात बदल घडवणारे तर आहेच शिवाय ज्यांना काही तरी साध्य करायचे आहे अशांना उर्जा देणारा स्त्रोत देखील आहेत. नशिबापेक्षा स्वतःच्या ताकतीवर विश्वास ठेवा असं सांगणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांवर मंथन करूया.

Dr. Babasaheb Aambedkar Quote : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडवणारे अनमोल विचार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 06, 2023 | 10:22 AM

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Aambedkar) यांचा आज 67 वा महानिर्वाण दिन आहे. भारताच्या संविधानाचे जनक आणि देशाला प्रगती पथावर आणणाऱ्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभुमीवर दाखल झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राज्यपाल देखील बाबासाहेबांना आदरांदली वाहण्यासाठी चैत्यभुमीवर दाखल झाले आहेत. महापरिनिर्वाण दिनाच्या निमीत्त्याने आपण बाबासाहेबांचे जीवनात बदल घडवणारे काही काही विचार जाणून घेऊया.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार

1. मला तो धर्म आवडतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो.

2. मी एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मापन त्यानुसार करतो जितकी तिथल्या महिलांनी प्रगती केली असेल.

3. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत.

4. शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि उत्साही व्हा.

5. धर्म माणसासाठी आहे आणि माणूस धर्मासाठी नाही.

6. माणूस नश्वर आहे, त्याचप्रमाणे विचार देखील नश्वर आहेत. एखाद्या कल्पनेच्या प्रसाराची गरज असते, जसे वनस्पतीला पाण्याची गरज असते, अन्यथा कोमेजून मरते.

7. महापुरुष हा प्रतिष्ठित माणसापेक्षा वेगळा असा असतो की, तो समाजाचा सेवक होण्यास तयार असतो.

8. समानता ही काल्पनिक गोष्ट असू शकते, परंतु तरीही ती एक नियमन तत्त्व म्हणून स्वीकारली पाहिजे.

9. बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे.

10. समानता ही काल्पनिक गोष्ट असू शकते, परंतु तरीही ते एक नियमन तत्त्व म्हणून स्वीकारले पाहिजे.

11. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

12. मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा, छोट्या गोष्टींने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

13. जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जागायचं हे शिकवेल. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

14. हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

15. नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर