Durga Saptashati : दुर्गा सप्तशती पाठाने दुर होतात मार्गातले विघ्न, कोणते नियम पाळणे आहे आवश्यक?

| Updated on: Mar 26, 2023 | 11:01 AM

दुर्गा सप्तशतीचे 13 अध्याय आहेत. त्यात एकूण 700 श्लोक आहेत. हे 700 श्लोक तीन भागात विभागलेले आहेत. दुर्गा सप्तशती हा असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये महिषासुर नावाच्या राक्षसावर दुर्गा देवीच्या विजयाचे वर्णन केले आहे.

Durga Saptashati : दुर्गा सप्तशती पाठाने दुर होतात मार्गातले विघ्न, कोणते नियम पाळणे आहे आवश्यक?
दुर्गा सप्तशती
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : दुर्गा सप्तशती (Durga Saptashati) हा असा स्रोत ज्याचा प्रत्त्येक मंत्र प्रभावी परिणाम देणारा आहे. सप्तशतीचा पाठ हा कल्याणकारी कवचासारखा आहे. नवरात्रीच्या या शुभ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण अत्यंत फलदायी, हितकारक आणि शुभ असते, असे ज्योतिषी सांगतात. दुर्गा सप्तशती हा असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये महिषासुर नावाच्या राक्षसावर दुर्गा देवीच्या विजयाचे वर्णन केले आहे. आज आपण दुर्गा सप्तशतीचे महत्त्व आणि फायदे सविस्तरपणे जाणून घेऊया.

काय आहे दुर्गा सप्तशती?

दुर्गा सप्तशतीमध्ये देवीच्या उपासनेसाठी सर्व मंत्र, स्तोत्रं आणि साधना पद्धती सांगितल्या आहेत. परंतु सर्वात मान्यताप्राप्त आणि अचुक स्तोत्रं म्हणजे दुर्गा सप्तशती. मार्कंडेय ऋषींनी त्याची रचना केली होती. यातील प्रत्येक श्लोक हा एक महान मंत्र आहे. नियम जाणून घेतल्याशिवाय दुर्गा सप्तशती वाचू नये, असे सांगितले जाते.

दुर्गा सप्तशतीचे 13 अध्याय आहेत. त्यात एकूण 700 श्लोक आहेत. हे 700 श्लोक तीन भागात विभागलेले आहेत – पहिले अक्षर, मधले वर्ण आणि सर्वोत्तम वर्ण. दुर्गा सप्तशती पाठाच्या श्लोकांचा नक्कीच परिणाम होतो. वास्तविक सप्तशतीमध्ये शक्ती प्राप्त करण्याचे आणि वापरण्याचे एक अद्भुत शास्त्र आहे. दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते असे म्हटले जाते.

हे सुद्धा वाचा

दुर्गा सप्तशतीचे मंत्र जप नियम

प्रथम आपल्या इच्छेनुसार मंत्र निवडा. नवरात्रीमध्ये मंत्रजप सुरू करा. दररोज किमान तीन वेळा मंत्राचा जप करावा आणि नऊ दिवस मंत्राचा सतत जप करावा. सप्तशतीच्या पाठापूर्वी उत्कीलन मंत्राचा जप करावा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही उत्कीलन मंत्रानंतर कवच, अर्गल आणि किलक पाठ करू शकता. सप्तशतीचे पूर्ण फळ मिळविण्यासाठी लाल वस्त्र परिधान करून पठण करावे. उपवास ठेवलात तर अजून बरे होईल. लाल चंदन किंवा रुद्राक्षाच्या माळाने मंत्राचा जप करावा.

कधी करू शकतो सप्तशतीचे पठण?

सप्तशतीचा पाठ कधीही करू शकता, परंतु नवरात्रीच्या वेळी ते पाठ करणे चांगले आहे. देवीच्या समोर तुपाचा दिवा लावावा. त्यांना लाल फुले अर्पण करा. यानंतर नियमितपणे सप्तशती पाठ करा. जेवढे दिवस सप्तशती पाठ कराल तेवढे दिवस सात्त्विकता ठेवा.

या मुख्य मंत्रांनी संकटांपासून मुक्ती मिळेल

 कल्याणकारी मंत्र

सर्व मंगलं मांगल्ये शिवे सर्वाथ साधिके ।
शरण्येत्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुऽते॥

सर्वविघ्ननाशक मंत्र

सर्वबाधा प्रशमनं त्रेलोक्याखिलेशवरी।
एवमेय त्वया  कार्यमस्माद्वैरि विनाशनम् ॥

धन प्राप्तिसाठी मंत्र

सर्वाबाधा विनिर्मुक्तो धन धान्य सुतान्वितः।
मनुष्यों मत्प्रसादेन भविष्यति  न संशय॥

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)