AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Durgashtami Today: आज मासीक दुर्गाष्टमी, अशा प्रकारे करा पुजा, होईल सर्व दुःखांचा नाश

अष्टमी तिथीला दुर्गेची (Durga Ashtami)पूजा केल्याने दीर्घायुष्य मिळते. असे मानले जाते की प्रत्येक महिन्याच्या अष्टमी तिथीला प्रार्थना केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांचे प्रत्येक संकटापासून रक्षण करते.

Durgashtami Today: आज मासीक दुर्गाष्टमी, अशा प्रकारे करा पुजा, होईल सर्व दुःखांचा नाश
दुर्गाष्टमीImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 29, 2023 | 2:10 PM
Share

मुंबई, दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी व्रत (Masik Durgashtami) केले जाते. यावेळी मासिक दुर्गाष्टमी आज म्हणजेच 29 जानेवारी 2023 रविवारी आहे. मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेची पूजा केली जाते. ज्याप्रमाणे चतुर्थी तिथी ही गणपतीला समर्पित असते, त्याचप्रमाणे अष्टमी तिथी ही माँ दुर्गेच्या उपासनेचा दिवस आहे. दुर्गादेवीची उपासना केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या वर्षी 21 जानेवारीपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात झाली. त्यामुळे 29 जानेवारीला दुर्गाष्टमी आहे.

दुर्गाष्टमीचा शुभ मुहूर्त

माघ, शुक्ल अष्टमी

सुरू होते – 28 जानेवारी, सकाळी 08:43 वाजता सुरू होते

संपेल – 29 जानेवारी, सकाळी 09:05 वाजता संपेल

दुर्गाष्टमी पूजा विधि

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि नंतर पूजास्थानी गंगाजल शिंपडावे आणि पवित्र करावे. यानंतर घरातील मंदिरात दिवा लावावा. माँ दुर्गेला गंगाजलाने अभिषेक करा. यानंतर आईला अक्षत, सिंदूर, लाल फुले अर्पण करा, त्यानंतर फळे आणि मिठाई प्रसाद म्हणून अर्पण करा. यानंतर दिवा आणि उदबत्ती लावून माँ दुर्गेची पूजा करून आरती करावी.

दुर्गाष्टमी कथा

धर्मग्रंथानुसार, शतकानुशतके असुर पृथ्वीवर खूप शक्तिशाली झाले होते आणि त्यांनी स्वर्गात चढण्यास सुरुवात केली होती. त्यांनी अनेक देवांचा वध करून स्वर्गात कहर निर्माण केला. त्यातील सर्वात शक्तिशाली राक्षस महिषासुर होता. भगवान शिव, भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेवाने देवी दुर्गा शक्तीच्या रूपात निर्माण केली. प्रत्येक देवाने दुर्गा देवीला एक खास शस्त्र दिले. यानंतर आदिशक्ती दुर्गा पृथ्वीवर आल्या आणि त्यांनी असुरांचा वध केला. माँ दुर्गेने महिषासुराच्या सैन्याशी युद्ध केले आणि शेवटी त्याचा वध केला. त्या दिवसापासून दुर्गाष्टमीचा उत्सव सुरू झाला.

कन्या भोजनाने होईल सर्व दुःखाचा नाश

  1.  2 ते 10 वर्षांच्या मुलींना कन्या पूजेत आमंत्रित करा. पूजेपूर्वी घरात स्वच्छता असावी हे लक्षात ठेवा.
  2. दोन वर्षांच्या मुलीची पूजा केल्याने दुःख आणि गरिबी दूर होते असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
  3. 3 वर्षांच्या मुलीला त्रिमूर्ती मानले जाते. त्रिमूर्तीची पूजा केल्याने घरात धन आणि अन्न येते.
  4. चार वर्षांची मुलगी कल्याणी मानली जाते.
  5. पाच वर्षांच्या मुलीला रोहिणी म्हणतात. त्यांची पूजा केल्याने रोग आणि दुःख दूर होतात.
  6. सहा वर्षांच्या मुलीला कालिका रुप म्हणतात. कालिका रुपातून ज्ञान आणि विजय प्राप्त होतो. सात वर्षांच्या मुलीला चंडिका म्हणतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.