AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng Shui : पैशांचा वर्षाव करणारे प्राणी; या मूर्ती तुमच्या घरात ठेवा आयुष्यच बदलून जाईल

फेंग शुईला चीनी वास्तुशास्त्र असं देखील म्हटलं जातं. फेंग शुईनुसार घरात काही विशिष्ट प्राण्यांच्या मूर्ती ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. त्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात.

Feng Shui : पैशांचा वर्षाव करणारे प्राणी; या मूर्ती तुमच्या घरात ठेवा आयुष्यच बदलून जाईल
FENG SHUI Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 02, 2026 | 8:37 PM
Share

फेंग शुई हे चीनी वास्तुशास्त्र आहे. ज्या प्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये काही प्राणी, पक्षी आणि झाडं शुभ माण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे फेंग शुईमध्ये देखील काही प्राणी, पक्षी आणि झाडं शुभ माण्यात आले आहेत. तुम्ही जर या प्राण्यांच्या मुर्ती घरात ठेवल्या तर त्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव तुमच्या घरावर होतो. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन ऊर्जा संतुलन साधलं जातं आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या समस्या नष्ट होतात, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे. फेंग शुईनुसार तुमच्या भोवती ज्या काही वस्तू असतात त्या प्रत्येक वस्तुंचा तुमच्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. तसेच तुम्ही ती वस्तू कोणत्या दिशेला ठेवली आहे? ती दिशा देखील महत्त्वाची असते. म्हणजे फेंग शुईमध्ये जर एखाद्या वस्तुला शुभ माण्यात आलं आहे, ती वस्तू तुम्ही तुमच्या घरात आणली मात्र ती जर चुकीच्या दिशेला ठेवली तर त्याचा उलट परिणाम हा तुमच्यावर होऊ शकतो. त्यामुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता असते.

फेंग शुईमध्ये असे काही प्राणी सांगण्यात आले आहेत, ज्यांच्या मूर्ती तुम्ही जर तुमच्या घरात ठेवल्या तर त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते. परिणामी तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होतो, तसेच अकस्मात धन प्राप्तीचा योग देखील बनू शकतो. मात्र या मुर्ती खरेदी करताना एक काळजी आवश्य घ्यावी, या मूर्ती आकाराने फार लहान किंवा मोठ्या असू नये, घरात मूर्ती खरेदी करताना नेहमी मध्यम आकाराच्याच मूर्ती खरेदी कराव्यात. चला तर मग जाणून घेऊयात या मूर्ती नेमक्या कोणत्या आहेत? आणि फेंग शुईमध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

हत्ती – फेंग शुई शास्त्रानुसार घरात हत्तीची मूर्ती ठेवणं हे अत्यंत शुभ माण्यात आलं आहे, कारण हत्तीला भव्यता आणि स्थिरतेचं प्रतिक माण्यात आलं आहे. जर तुमच्या घरात हत्तीची मूर्ती असेल तर तुमच्याकडे आलेला पैसा तुमच्या हातात टिकून राहतो, अनावश्यक खर्चाला आळा बसतो, पैशांची बचत होते. तसेच जर तुमच्या आयुष्यात काही आर्थिक समस्या असतील तर त्या देखील दूर होतात असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

घोडा – घोड्याला चपळतेचं आणि प्रगतीचं प्रतिक माण्यात आलं आहे. फेंग शुई शास्त्रानुसार तुम्ही जर तुमच्या घरात घोड्याची मूर्ती ठेवली तर त्यामुळे तुमचं नशीब देखील घोड्या सारखं धावू लागतं. तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतात. करिअरमध्ये तुम्ही मोठी झेप घेता असं फेंग शुई शास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता