Fengshui : नोकरी व्यवसायात पाहिजे असेल बरकत तर अवश्य करा फेंगशुईचे हे उपाय

फेंगशुई तज्ज्ञांच्या मते, जर तुमचे जीवनही अनेक समस्यांनी वेढलेले असेल तर फेंगशुईमध्ये सांगितलेले काही सोपे उपाय अवलंबून तुम्ही त्यावर मात करू शकता.

Fengshui : नोकरी व्यवसायात पाहिजे असेल बरकत तर अवश्य करा फेंगशुईचे हे उपाय
फेंगशुई
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 12, 2023 | 9:47 AM

मुंबई : भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे चिनी वास्तुशास्त्र देखील आहे ज्याला फेंगशुई (Fengshui) नावाने ओळखले जाते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवते. आजकाल वास्तूप्रमाणेच लोकं घरातील फेंगशुई गोष्टींवरही जास्त भर देत आहेत. असे म्हणतात की, या वस्तू घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो आणि कुटूंबातील समस्या नष्ट होतात. फेंगशुई तज्ज्ञांच्या मते, जर तुमचे जीवनही अनेक समस्यांनी वेढलेले असेल तर फेंगशुईमध्ये सांगितलेले काही सोपे उपाय अवलंबून तुम्ही त्यावर मात करू शकता. या उपायांबद्दल जाणून घ्या.

फेंगशुईचे हे उपाय अत्यंत प्रभावी

फेंगशुई तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही आर्थिक तंगीमुळे चिंतेत असाल आणि पैशाची कमतरता तुमचा आनंद हिरावून घेत असेल, तर घरात बांबूचे रोप लावा. असे म्हटले जाते की ही वनस्पती संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करते.

  1.  फेंगशुईमध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, त्या घरात ठेवल्याने सौभाग्य वाढते. घराच्या दिवाणखान्यात फेंगशुई बेडूक दक्षिण-पूर्व दिशेला ठेवल्याने व्यक्तीला पैशाची कमतरता भासत नाही. एवढेच नाही तर करिअरमध्येही प्रगती होते.
  2. घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवायची असेल, तर फेंगशुई लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवता येते, जर ती नियमानुसार ठेवली तर त्याचा परिणाम लवकर दिसून येतो.
  3. दुसरीकडे, जर तुम्ही नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी सतत मेहनत करत असाल आणि तरीही अयशस्वी असाल तर घरात एक सुंदर विंड चाइम लावा. यामुळे व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात. माणसाला प्रगतीचा नवा मार्ग मिळतो.
  4. फेंगशुईनुसार, जर तुम्हाला व्यवसायात प्रगती करायची असेल तर कामाच्या ठिकाणी दोन्ही हात वर करून लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवा. यामुळे तुम्हाला व्यवसायात लवकरच फायदा होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)