
हिंदू धर्मात पूर्वजांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. धार्मिक मान्यतेनुसार, ज्या घरात पूर्वजांचा आशीर्वाद असतो त्या घरात शांती आणि आनंद, सुख नांदते. तसेच घरातील सदस्यांचे ते नेहमीच रक्षण करत असतात. तसेच आता पितृपक्षाचा महिना सुरु आहे. जो 21 सप्टेंबर 2025 रोजी संपेल. या दिवसांमध्ये पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान आणि तर्पण केले जाते. हा महिना म्हणजे पित्रांना अन्न अर्पण केलं जातं.
पूर्वजांच्याबाबतीत काही गोष्टींचे पालन केले नाही तर नक्कीच त्याचे उलटे परिणाम जाणवू शकतात.
दरम्यान जर पूर्वजांच्याबाबतीत काही गोष्टींचे पालन केले नाही तर नक्कीच त्याचे उलटे परिणाम जाणवू शकतात. ज्यामुळे पितृदोष लागू शकतो. त्यातील एक गोष्ट म्हणजे घरात पूर्वजांचे फोटो लावणे. वास्तुशास्त्रात घरात पूर्वजांचे फोटो लावण्याबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. जर त्यांचे पालन केले नाही तर नक्कीच त्याचा त्रास होऊ शकतो. या कारणास्तव पितृदोष झाला तर अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच, घरात पूर्वजांचे चित्र लावताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. घरात पूर्वजांचे फोटो लावण्याचे नियम आणि पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी उपाय काय आहेत ते जाणून घेऊया.
पूर्वजांच्या फोटोशी संबंधित वास्तु नियम
वास्तूशास्त्रानुसार घरात पूर्वजांचे फोटो लावणे शक्यतो टाळले पाहिजे
जर तुम्हाला पूर्वजांचे फोटो लावायचाच असेल तर तो नेहमी दक्षिणेकडील भिंतीवर लावावे कारण ही दिशा पूर्वजांची मानली जाते.
असे म्हटले जाते की या दिशेने पूर्वजांचे चित्र लावल्याने आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात.
पूर्वजांचे फोटो कधीही पूर्व, उत्तर आणि ईशान्य दिशेला लावू नयेत. असे केल्याने पाप घडते किंवा वास्तूदोषही लागतो.
वास्तुशास्त्रानुसार, पूर्वजांचे फोटो कधीही देव-देवतांच्या मूर्तींसोबत लावू नयेत. त्यामुळे वास्तूदोष निर्माण होतोच पण त्याच्या घरातही परिणाम दिसू लागतात
याशिवाय बेडरूममध्ये, स्वयंपाकघरात, मुख्य दरवाजात किंवा मंदिरात पूर्वजांचे फोटो लावणे टाळावे. असे करणे अशुभ मानले जाते असे म्हटले जाते.
पूर्वजांचे फोटो वेळोवेळी स्वच्छ करत रहा. त्यावर धूळ साचू देऊ नका. तसेच त्याची जपमाळ बदलत रहा.
म्हणून फोटो योग्य ठिकाणी ठेवणे आवश्यक
नियमांनुसार पूर्वजांचे फोटो घरात लावायचेच असल्यास ते लावण्यासाठी योग्य दिशा आणि ठिकाण निवडणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा पितृदोष लागतो,तसेच घरातही कलह निर्माण होऊ शकतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)