
मंत्राचा जप आवश्यक : वैवाहिक जीवनात सुख-समृद्धीसाठी ‘ओम ह्नी क्लीं मातंगय फत्सवाहा’ या मंत्राचा जप करावा. ज्योतिष शास्त्रानुसार हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे तुमच्यातील वाद कमी होतील. या मंत्राच्या उच्चाराने घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होईल.

शिवाची पूजा : दररोज शिव आणि पार्वतीची पूजा करा. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मूर्तीसमोर दररोज दिवा लावा आणि घरात सुख-शांतीचे वातावरण निर्माण करा.

जोडीदारासाठी: ज्योतिष शास्त्रानुसार रात्री झोपताना पतीच्या डोक्यावर सिंदूर लावा. या उपायाने तुमच्यातील भंडणे कमी होऊ शकतील.

पिठाचा उपाय : ज्योतिष शास्त्रानुसार गव्हाचे पीठ शनिवारी किंवा सोमवारी घरात आणावे. यामुळे तुमचे त्रास दूर होतात.