शारदीय नवरात्रीत ‘या’ वास्तु टिप्सचे पालन करा, तुम्हाला देवी लक्ष्मीचा तसेच शनिदेवाचे मिळतील आशीर्वाद

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. त्यात हे दिवस खूप पवित्र मानले जाता. म्हणूनच या दिवसांमध्ये काही वास्तु टिप्स पाळल्या तर तुम्हाला देवीच्या आशीर्वादाने जीवनात शुभ संकेत मिळण्यास सुरुवात होईल. तर चला या वास्तु टिप्सबद्दल जाणून घेऊयात.

शारदीय नवरात्रीत या वास्तु टिप्सचे पालन करा, तुम्हाला देवी लक्ष्मीचा तसेच शनिदेवाचे मिळतील आशीर्वाद
शारदीय नवरात्रीत 'या' वास्तु टिप्सचे पालन करा, तुम्हाला देवी लक्ष्मीचा तसेच शनिदेवाचे मिळतील आशीर्वाद
| Edited By: | Updated on: Sep 23, 2025 | 6:07 PM

सोमवार 22 सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्र उत्सवाला सुरूवात होणार आहे. तर 2 ऑक्टोबरला या उत्सवाची समाप्ती होणार आहे. तर आजच्या या लेखात आपण काही वास्तु टिप्स बद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्ही नवरात्रीच्या या दिवसांमध्ये लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहण्यासोबतच घरात आनंद आणि समृद्धी येते. तसेच या वास्तू टिप्सचे पालन केल्याने तुम्हाला शनिदेवाचे आशीर्वाद देखील मिळतात, ज्यामुळे होणाऱ्या त्रासापासून तुमची सुटका होते. तर कोणत्या वास्तूच्या नियमांचे पालन करावे, हे जाणून घेऊयात.

घरातील कोपरे स्वच्छ ठेवा

देवीच्या आगमनापूर्वी तुम्ही तुमचे घर आणि तुमचे देव्हारा पूर्णपणे स्वच्छ करून घ्या. तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. कारण वास्तुशास्त्रात ही दिशा शनीचे अधिराज्य मानली जाते. यासाठी तुम्ही या दिशेशी संबंधित वास्तु नियम नक्कीच लक्षात ठेवावेत. घराच्या नैऋत्य कोपऱ्यात तुटलेल्या किंवा जड वस्तू ठेवणे टाळा. तुम्ही या ठिकाणी दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे देखील ठेवू शकता.

मुख्य प्रवेशद्वारासाठी वास्तु नियम

वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य दरवाजाला विशेष महत्त्व दिले आहे कारण त्यातूनच घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. म्हणून, तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर स्वच्छता राखली पाहिजे. तसेच मुख्य प्रवेशद्वाराजवळ कचराकुंडी किंवा झाडू ठेवू नका.

तसेच दरवाजा उघडताना आवाज होणार नाही याची खात्री करा. नवरात्रीच्या वेळी संध्याकाळी तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावू शकता, ज्यामुळे तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी येईल आणि नकारात्मकता दूर होईल.

हे काम नक्की करा

आपल्यापैकी अनेकजण नवरात्रीच्या दिवसांमध्ये घरात घटस्थापनेच्या दिवशी घरात कलशाची प्रतिष्ठापना करतात आणि त्यासमोर अखंड नऊ दिवस ज्योत पेटवली जाते. तर वास्तुनुसार ती नेहमी आग्नेय दिशेला ठेवावी. तर नवरात्रीच्या या पवित्र दिवसांमध्ये नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी तुम्ही संध्याकाळी घराच्या चारही कोपऱ्यात दिवे लावू शकता.

याव्यतिरिक्त घरात वापरात नसलेल्या वस्तू नवरात्रीपूर्वी काढून टाकाव्यात , कारण या वस्तू नकारात्मक ऊर्जा वाढवतात. नवरात्रीत गरजूंना काळे तीळ, अन्न आणि उडीद डाळ दान करा, ज्यामुळे तुम्हाला भगवान शनिदेवाचा आशीर्वाद मिळेल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)