महिला वारकऱ्यांठी पुढे सरसावली शरद पवारांची नात; देवयानी पवार यांचा महिलांसाठी आरोग्यविषयक उपक्रम

| Updated on: Jun 29, 2022 | 8:59 PM

 संत तुकाराम महाराज (Sant Tukaram maharaj palkhi) यांचा पालखी सोहळा सध्या सुरू आहे. ही पालखी पंढरीच्या दिशेने रवाना होत आहे. पालखी मार्गावर वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी अनेक समाजसेवी संस्था पुढे सरसावत असतात. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. यामध्ये ग्लोबल शेपर (Glober shaper)  या संस्थेचा उपक्रम स्तुत्यपूर्ण आहे. पालखी सोहळ्यामध्ये महिला देखील मोठ्या प्रमाणावर चालत असतात. या […]

महिला वारकऱ्यांठी पुढे सरसावली शरद पवारांची नात; देवयानी पवार यांचा महिलांसाठी आरोग्यविषयक उपक्रम
Follow us on

 संत तुकाराम महाराज (Sant Tukaram maharaj palkhi) यांचा पालखी सोहळा सध्या सुरू आहे. ही पालखी पंढरीच्या दिशेने रवाना होत आहे. पालखी मार्गावर वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी अनेक समाजसेवी संस्था पुढे सरसावत असतात. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. यामध्ये ग्लोबल शेपर (Glober shaper)  या संस्थेचा उपक्रम स्तुत्यपूर्ण आहे. पालखी सोहळ्यामध्ये महिला देखील मोठ्या प्रमाणावर चालत असतात. या सोहळ्यात महिलांच्या मासिक पाळीचा प्रश्न देखील प्रामुख्याने उद्भवत असतो. अशा वेळी महिलांना सॅनिटरी पॅडची व्यवस्था ग्लोबल शेपर या संस्थेकडून केली जात आहे. ही संस्था महिलांना सॅनिटरी पॅड देत आहे तसंच मासिक पाळी दरम्यान हे पॅड बदलण्याची व्यवस्था देखील या ग्लोबल शेपर संस्थेकडून करण्यात आली आहे. ही संस्था चालवण्याचं काम शरद पवार यांची नात देवयानी पवार (Devyani Pawar) करत आहेत. देवयानी पवार यांना त्यांचे सहकारी देखील या कार्यात मदत करत आहेत.

दरम्यान  संत तुकारामांच्या पालखीचा आज दौंड तालुक्यातील सनसर येथे मुक्काम असणार आहे. कोरोना निर्बंधामुळे गेले दोन वर्ष पंढरपूर वारीला ब्रेक लागला होता. विठुरायाच्या कृपेने यंदा निर्बंधमुक्त वारी करण्याचा योग वारकऱ्यांना आला आहे, त्यामुळे वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातवरण आहे. वारकरी सांप्रदायात तुकोबांच्या वारीला विशेष महत्त्व असते. दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहाने टाळ,मृदुंगाच्या तालात डोलत मुखी विठू माऊलीचं नाव घेत वारी चालतात, त्यामुळे या वारीचा विशिष्ट अनुभव असतो.

हे सुद्धा वाचा

यंदा 10 जुलैला पार पडणार्‍या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी 20 जूनला देहू  मधून संत तुकाराम महाराजांची आणि 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी येथून प्रस्थान केले. यंदा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी झाल्या आहेत. वारी करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. तर 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी होईल. तुकारामांच्या पालखीमध्ये ‘रिंगण’ हे विशेष आकर्षण असते.