Guru Purnima 2025 : गुरु पौर्णिमेला तुमच्या राशीनुसार फक्त ‘हे’ करा उपाय, नशीब पालटलंच समजा

उद्या १० जुलै, गुरुवारी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येतेय. या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी १२ राशींसाठी कोणते उपाय करायला हवेत जेणे करून तुम्हाला नक्कीच फायदा होईल, जाणून घ्या...

Guru Purnima 2025 : गुरु पौर्णिमेला तुमच्या राशीनुसार फक्त हे करा उपाय, नशीब पालटलंच समजा
rashi upay
| Updated on: Jul 09, 2025 | 7:04 PM

हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही संबोधले जाते. हा दिवस गुरुंच्या पूजेसाठी देखील समर्पित करण्यात येतो आहे. या दिवशी लोक त्यांच्या गुरुंची पूजा करतात आणि त्यांना आदर देतात. याच दिवशी तुमच्या राशीनुसार काही उपाय करा, तुमच्या आयुष्यातील अडथळे नक्कीच दूर होतील.

मेष (Aries )

गुरुपौर्णिमेला मेष राशीच्या लोकांनी पिवळे कपडे परिधान करून भगवान विष्णूंची पूजा करावी. “ॐ बृं बृहस्पतये नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. केळीचं झाड लावावं किंवा त्याला पाणी अर्पण करावं.

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांनी गरीब मुलांना अभ्यासाचे साहित्य दान करावे. गाईला गूळ आणि चणे खाऊ घालावे. पिवळ्या रंगाची मिठाई दान करावी.

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांनी ब्राह्मणांना पिवळा पेन किंवा वही भेट द्यावी. “ॐ गुरु देवाय नमः” असा जप करावा. तुमच्या गुरु किंवा शिक्षकांना पुस्तक भेट द्यावी.

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेला मंदिरात पिवळा भाताचा नैवेद्य दाखवावा. गरजूंना अन्नदान करावे. पालकांचा किंवा कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद घ्यावा.

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी सूर्याला जल अर्पण करावे आणि “ॐ आदित्याय नमः” असा जप करावा. गुरुवारी पिवळे कपडे परिधान करावे. यासह गरीब ब्राह्मणांना केशर किंवा हळद, हळदकुंड दान करावीत.

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांनी मंदिरात पिवळा ध्वज लावावा. केळी आणि हळद दान करावे

तुळ (Libra)

तुळ राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेला पिवळ्या फुलांनी भगवान विष्णू आणि गुरु बृहस्पतीची पूजा करावी. विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य द्यावे. पिवळे कपडे परिधान करून मंदिरात चणे आणि गूळाचा प्रसाद अर्पण करावा

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांनी मुलांना पिवळ्या रंगाची मिठाई दान करावी, “ॐ ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरवे नमः”, असा जप करावा.

धनु (Sagittarius)

तुमच्या इष्ट देवाची आणि गुरुची एकत्रित पूजा करून पिवळी फळे, हळदकुंड, बेसन यासारख्या पिवळ्या वस्तूंचे दान करावे. तुमच्या पूर्वजांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.

मकर (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनी गुरुवारी उपवास करावा आणि पिवळी फुले देवाला अर्पण करावीत. वृद्ध ब्राह्मणाला वस्त्रदान करावं. गायीला पोळी आणि गूळ खाऊ घालावा.

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांनी उद्या पिवळी फळे आणि कपडे दान करावेत. शाळेतील मुलांना अभ्यासाचे साहित्य दान करावे. “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करावा.

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. केळीच्या झाडाची पूजा करावी. पिवळ्या मिठाईचे दान करावे

Disclaimer:  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)