Sanjay Gaikwad : टॉवेल, बनियानवर शिंदेंच्या आमदाराची गुंडागर्दी, कँटीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण अन्.. बघा VIDEO नेमकं घडलं काय?
आमदार निवासामध्ये निकृष्ट जेवण दिल्यामुळे संजय गायकवाड यांचा राडा पाहायला मिळाला. आकाशवाणी आमदार निवासा मधील कर्मचाऱ्याला गायकवाड यांनी फटकावलेला आहे. संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला मारहाण केली. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. मारहाणीचं कारण होतं निकृष्ट दर्जाचं आणि खराब झालेलं जेवण. रात्री साडे नऊच्या सुमारास संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमधून भात, डाळ आणि चपाती मागवली. पण जेवताना डाळीचा वास आल्याने आमदार महोदय चांगलेच भडकले. संजय गायकवाड आहे त्या स्थितीत म्हणजेच टॉवेल, बनियानवर संजय गायकवाड थेट कॅन्टीनमध्ये पोहोचले.
गुलाबी रंगाचा टॉवेल, पांढऱ्या रंगाचा बनियान, बनियानाला अडकवलेला चष्मा आणि हातामध्ये डाळीची पिशवी घेऊन आमदार थेट कॅन्टीनमध्ये आले. त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला डाळीची पिशवी दाखवत वास घ्यायला सांगितला. डाळ खराब असल्याचं कर्मचाऱ्यानं मान्य केलं. डाळ कोणी दिली असा जाब विचारत गायकवाडांनी कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांनी कर्मचाऱ्याला सहा चापट्या आणि चार ठोसे लगावले. गायकवाडाचा एक ठोसा कर्मचाऱ्याच्या छातीवर बसला. या ठोसात तो कर्मचारी खाली कोसळला. बघा व्हिडीओ पुढे काय घडलं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

