
हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. घरातील दिशा, वस्तू अशा बऱ्याच गोष्टींबद्दल वास्तूशास्त्रात नियम सांगण्यात आले आहेत.यातच अजून एका कामाबद्दल त्याच्या नियमांबद्दल सांगण्यात आलं आहे. ते काम म्हणजे घराची साफ-सफाई. वास्तुशास्त्रात घर पुसण्याचेही नियम सांगण्यात आले आहेत. वास्तुनुसार अशा काही वेळ, दिवस असतात ज्यावेळी घराची साफसफाई करणे अशुभ मानले जाते. जाणून घेऊयात की वास्तुशास्त्रानुसार घराची साफसफाई करण्याबाबत नेमकं काय सांगितलं आहे.
यावेळी घरातील केर काढणे अशुभ मानले जाते
वास्तुशास्त्रानुसार सूर्योदयानंतर आणि दुपारपूर्वी पुसणे शुभ मानले गेले आहे. शिवाय, पुसणे नेहमीच प्रवेशद्वारापासून सुरू करावे आणि मग बाकिचे घर पुसावे. तसेच ब्रह्म मुहूर्तावेळी फरशी पुसणे किंवा घराची साफसफाई करू नये. कारण तेव्हा प्रार्थनेची वेळ असते. त्यामुळे तेव्हा घरातील केर काढणे अशुभ मानले जाते. तसेच गुरुवार आणि एकादशीला फरशी पुसने टाळावे किंवा घराची साफसफाई करणे टाळावे.पण यामागे काय कारण आहे जाणून घेऊयात.
या दोन दिवशी साफसफाई करू नये
गुरुवार: वास्तुशास्त्रानुसार, गुरुवारी फरशी पुसणे टाळावे. असे केल्याने गुरु ग्रह क्रोधित होतात आणि घरात दोष निर्माण होऊ शकतात. तथापि, नियमांचे पालन करणाऱ्यांना शुभ फळे मिळू शकतात.
एकादशी: एकादशीला घराची साफसफाई करणे देखील टाळावे. असे केल्याने कुटुंबावर नकारात्मक परिणाम होण्याचा धोका वाढतो. शिवाय, कोणतेही काम सुरू होण्यापूर्वीच त्यात अडथळे येऊ शकतात.
फरशी पुसण्याची योग्य वेळ: वास्तुनुसार, ब्रह्म मुहूर्तावेळी घराची साफ-सफाई करू नये. दिवसा फरशी पुसण्याची किंवा साफसफाई करण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्योदयानंतर असे म्हटले जाते की या वेळी फरशी पुसल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. ज्यामुळे शांती आणि आनंद टिकतो. सूर्योदयाच्या वेळी किंवा त्यानंतर लगेच फरशी पुसणे देखील शुभ मानले जाते, कारण यामुळे घरात समृद्धी येते.
झाडू कधी घेऊ नये : दुपारी कधीही घरात झाडू नका. त्याचप्रमाणे, सूर्यास्तानंतर देखील घरात झाडू मारणे टाळावे, कारण यामुळे तुमच्या घरात नकारात्मकता येते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)