
Vivah Subh Muhurat 2026 : सध्या लग्न सराई सुरु आहे. दिवाळी झाली आणि तुळशीचं लग्न लागलं की, विवाहांचे मुहूर्त काढले जातात.. अनेकांचं लग्न डिसेंबर महिन्यात पार पडतं तर, अनेक जण पुढच्या वर्षी लग्नाचा निर्णय घेतात. आता लवकरच 2026 सुरु होणार आहे. नवीन वर्ष सर्वांसाठी नवीन आशा आणि आनंद घेऊन येते. ज्योतिषींनी सांगितल्यानुसार, 2026 हे वर्ष विवाह आणि शुभ कार्यक्रमांसाठी खूप शुभ आहे. वर्षभरात, लग्नासाठी अनेक शुभ काळ असतील.
ज्येष्ठ महिन्यासोबत येणाऱ्या अतिरिक्त महिन्यात आणि देवशयनी एकादशीपासून देवुथनी एकादशीपर्यंतच्या चातुर्मासात विवाह होणार नाहीत. याशिवाय, दर महिन्याला लग्नासाठी शुभ मुहूर्त आहेत. 2026 मध्ये, लग्नासाठी एकूण 59 शुभ तारखा असतील. तर, पुढच्या वर्षी मे पर्यंत लग्नासाठी किती शुभ तारखा उपलब्ध आहेत ते जाणून घेऊया.
4 फेब्रुवारी 2026 रोजी लग्नाचे मुहूर्त सुरू होतील. फेब्रुवारीच्या अखेरीस ते 4 मार्च पर्यंत होलाष्टक काळ असल्याने, विवाह पुन्हा पुढे ढकलले जातील. यानंतर, 14 मार्च 2026 रोजी, सूर्य गुरूच्या राशी मीन राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे खरमास पुन्हा सुरू होईल, जो 13 एप्रिल 2026 पर्यंत राहिल.
फेब्रुवारीमध्ये लग्नासाठी 12 शुभ मुहूर्त आहेत – 5 फेब्रुवारी – गुरुवार, 6 फेब्रुवारी – शुक्रवार, 8 फेब्रुवारी – रविवार, 10 फेब्रुवारी – मंगळवार, 12 फेब्रुवारी – गुरुवार, 14 फेब्रुवारी – शनिवार, 19 फेब्रुवारी – गुरुवार, 20 फेब्रुवारी – शुक्रवार, 21 फेब्रुवारी – शनिवार, 24 फेब्रुवारी – मंगळवार, 25 फेब्रुवारी – बुधवार, 26 फेब्रुवारी – गुरुवार…
मार्चमध्ये लग्नासाठी 8 शुभ मुहूर्त आहेत – 2 मार्च-सोमवार, 2 मार्च – मंगळवार, 4 मार्च – बुधवार, 7 मार्च – शनिवार, 8 मार्च -रविवार, 9 मार्च – सोमवार, 11 मार्च – बुधवार, 12 मार्च – गुरुवार.
एप्रिलमध्ये देखील लग्नासाठी 15 शुभ मुहूर्त आहेत बुधवार, 20 एप्रिल – सोमवार, 21 एप्रिल – मंगळवार, 25 एप्रिल – शनिवार, 26 एप्रिल – रविवार, 27 एप्रिल – सोमवार, 28 एप्रिल – मंगळवार, 29 एप्रिल – बुधवार.
मे महिन्यात देखील लग्नासाठी 8 शुभमुहूर्त आहेत. 1 मे – शुक्रवार, 3 मे – रविवार, 5 मे – मंगळवार, 6 मे – बुधवार, 7 मे – गुरुवार, 8 मे – शुक्रवार, 13 मे – बुधवार, 14 मे – गुरुवार. मे पर्यंत एकूण 36 शुभ लग्नाच्या तारखा आहेत. त्यानंतर जून, जुलै आणि त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये लग्नासाठी शुभ तारखा आहेत.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)