लग्न जुण्यात येत असतील अडथळे तर घरात अवश्य लावा हे झाड

घरामध्ये शमीचे रोप लावल्याने भगवंताचा आशीर्वाद मिळतो आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही अशी धार्मिक मान्यता आहे.

लग्न जुण्यात येत असतील अडथळे तर घरात अवश्य लावा हे झाड
शमी
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 23, 2023 | 10:08 AM

मुंबई : हिंदू धर्मात ज्याप्रमाणे तुळशीच्या रोपाला विशेष धार्मिक महत्त्व आहे, त्याचप्रमाणे शमीच्या रोपालाही (Shami puja) खूप शुभ मानले जाते. तुळशीच्या रोपाप्रमाणेच शमीचे रोप ज्या घरात राहते, त्या घरात नेहमी सुख-समृद्धी राहते. विशेष म्हणजे हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींचेही पूजनीय वर्णन केले आहे. तुळशी, पीपळ, वड याबरोबरच शमी या वनस्पतीलाही धार्मिक महत्त्व आहे.

शमीच्या रोपात भगवान भोलेनाथ करतात वास

शमीच्या रोपामध्ये भगवान शिव वास करतात अशी धार्मिक श्रद्धा असून भोलेनाथची पूजा करताना त्यांना शमीची पानेही अर्पण केली जातात. जर तुम्हीही घरात शमीचे रोप लावले असेल तर हे नियम आणि फायदे पाळावेत.

शमीचे रोप घरी लावल्याने होतात फायदे

घरामध्ये शमीचे रोप लावल्याने भगवंताचा आशीर्वाद मिळतो आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही अशी धार्मिक मान्यता आहे. शमीच्या रोपाची लागवड करताना नियमानुसार पूजा करणे आवश्यक आहे.

शमीचे रोप घरात तुळशीसारखे लावल्याने सर्व दु:ख दूर होऊन सुख-समृद्धी येते. घरामध्ये शमीचे रोप लावल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो.

वास्तुशास्त्रातही शमीची वनस्पती शुभ मानली जाते. घरामध्ये शमीचे रोप लावल्याने वास्तू दोष दूर होतात आणि घरातील सर्व अडथळे दूर होतात. नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.

शमीचे रोप घरात लावल्याने विवाहात येणारे अडथळे दूर होतात. जर एखाद्या व्यक्तीच्या लग्नाला उशीर होत असेल तर घरामध्ये शमीचे रोप लावून त्याची पूजा करावी, असे केल्याने विवाहात येणारे सर्व अडथळे दूर होतात.

जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला शनीची साडेसाती असेल तर घरात शमीचे रोप लावल्याने साडे सातीचा प्रभाव कमी होतो. कोणत्याही कामात येणारा अडथळाही दूर होतो.

शमीचे रोप घरात नेहमी शनिवारीच लावावे. हे रोप घराच्या आत लावण्याऐवजी बागेत किंवा बाल्कनीमध्ये लावावे. घराबाहेर पडताना ही वनस्पती तुमच्या उजव्या बाजूला असावी. शमीचे रोप फक्त दक्षिण दिशेला टेरेसवर ठेवणे शुभ असते. तुळशीसोबत शमीच्या रोपाचीही रोज पूजा करावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)