
हिंदू पंचागानुसार दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो, दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळीला दीपोत्सव असं देखील म्हटलं जातं. दिवाळीमध्ये प्रकाशाला खूप महत्त्व असून, या काळात दिव्यांनी संपूर्ण घर उजळून निघतं, माता लक्ष्मीची पूजा केली जाते. वास्तुशास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन केल्यास आपल्या भक्तांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो, घरावर कोणत्याही प्रकारचं आर्थिक संकट येत नाही. जे घर स्वच्छ असतं, जिथे नकारात्मक शक्तींचा प्रवेश नसतो, त्या घरावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो असं मानलं जातं, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरात लक्ष्मी मातेचं आगमन होतं असं मानलं जातं, त्यामुळे या काळात घरामध्ये दिवे लावून लक्ष्मी मातेचं स्वागत केलं जातं, वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुमच्यासोबत दिवाळीच्या दिवशी घडल्या तर लवकरच तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल.
घुबडाचं दर्शन – वास्तुशास्त्रानुसार दिवाळीच्या एक रात्र आधी जर तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास घुबडाचं दर्शन झालं, घुबड दिसलं तर हे खूपच शुभ संकेत असतात. याचाच अर्थ लवकरच तुमची आर्थिक परिस्थिती बदलणार आहे, तुमच्यावरील सर्व प्रकारचे आर्थिक संकट दूर होणार आहेत, याचे हे संकेत असतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
धनामध्ये वृद्धी किंवा नोकरीत प्रमोशन – जर दिवाळीच्या दिवशी किंवा एक- ते दोन दिवस आधी जर तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं किंवा तुमच्याकडे अचानक कोणत्याही मार्गाने पैसे आले तर तो एक शुभ संकेत असतो, याचाच अर्थ लवकरच तुम्हाला आता सुखाचे दिवस येणार आहेत, असा होतो.
कर्जातून मुक्त होणं किंवा खर्च अचानक कमी होणं – हा देखील एक शुभ संकेत आहे, जर या काळात तुमच्यावर असलेले कर्ज फिटलं तर सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे, असा त्याचा अर्थ होतो.
दिवाळीच्या दिवशी तुमच्या घरासमोर गायीचं आगमन – हा देखील एक शुभ संकेत असतो, जर दिवाळीच्या दिवशी गाय तुमच्या दारात आली तर तिची पूजा करा, कारण याचा अर्थ तुमच्यावर देवी, देवता प्रसन्न आहेत, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)