
स्वप्न शास्त्रानुसार आपल्याला पडत असलेल्या स्वप्नांचे अनेक विविध अर्थ निघत असतात. काही स्वप्नांद्वारे आपल्याला बऱ्याच घटनांचे काही संकेतही मिळतात. मग ते चांगले स्वप्न असो किंवा मग वाईट. स्वप्न शास्त्रात प्रत्येक स्वप्नांचे अर्थ सांगितले आहेत.
अनेकदा देवी-देवतांचे स्वप्न पडतात.
अनेकदा देवी-देवतांचे स्वप्न पडतात. पण त्याचा नेमका अर्थ समजण्यात गोंधळ होतो. आता नवरात्र सुरु आहे आणि या दरम्यान किंवा यानंतरही कधी जर कधी स्वप्नात देवी दुर्गा मातेचे दर्शन झाले तर त्याचे काय संकेत असतात आणि नेमका काय अर्थ असतो जाणून घेऊयात.
स्वप्नांना आपल्या आयुष्यात विशेष महत्त्व असते. स्वप्नशास्त्रानुसार, काही स्वप्ने इतकी खास असतात की ती थेट तुमच्या नशिबात बदल होण्याचे संकेत देतात. त्यातीलच एक म्हणजे देवी दुर्गाचे स्वप्नात दर्शन होणे. मुख्य म्हणजे देवीचे स्वप्नात दर्शन होणे हे अत्यंत दुर्मिळ स्वप्न मानले जाते. तसेच ते शुभ संकेत मानले जातात. स्वप्नात देवी दुर्गा मातेचे दर्शन खरोखरच चमत्कारिक आहे.याचे काय अर्थ असतात जाणून घेऊयात.
जर स्वप्नात देवी दुर्गा मातेचे दर्शन झाले तर काय संकेत?
जीवनातील संकटांचा अंत : जर तुमच्या स्वप्नात देवी दुर्गा शांत आणि आनंदी मुद्रेत दिसली तर समजून घ्या की तुमचे दुःख आणि संकटे आता संपणार आहेत.
मोठे यश आणि विजय : जर देवी दुर्गा सिंहावर स्वार झालेली किंवा त्रिशूळ धरलेली दिसली तर ते तुमच्या करिअर, व्यवसाय किंवा कोणत्याही कायदेशीर प्रकरणात मोठ्या यशाचे लक्षण आहे.
संपत्ती आणि समृद्धी : जर तुम्हाला देवी दुर्गा लाल साडी नेसलेली किंवा हातात कमळाचे फूल धरलेली दिसली तर याचा अर्थ असा की तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील.
आरोग्य फायदे आणि सुरक्षितता : जर तुम्हाला स्वप्नात तेजस्वी प्रकाशात देवी दुर्गा दिसली तर ते तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याचे आणि सुरक्षिततेचे लक्षण आहे.
इच्छा पूर्ण होणे : जर देवी दुर्गा तुम्हाला फुले किंवा फळे भेट देत असेल तर तुमच्या अपूर्ण इच्छा लवकरच पूर्ण होतील असे ते संकेत असतात, विशेषतः मूल होणे किंवा लग्न यासारख्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असते.
देवीचे स्वप्न पडल्यावर काय करावे?
जेव्हा जेव्हा तुम्हाला देवी दुर्गाचे दिव्य दर्शन जर स्वप्नात दिसले तर, सर्व प्रथम देवीचे आभार मानावे. तसेच स्नान केल्यानंतर, दुर्गा चालीसा पाठ करा. देवीची मनोभावे पूजा करावी.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)