पहिल्यांदाच एकादशीचे व्रत सुरू करायचंय तर ‘हा’ दिवस आहे सर्वात शुभ, जाणून घ्या तारीख

हिंदू धर्मात एकादशीचे व्रत खूप शुभ आणि फलदायी मानले जाते. एकादशी तिथी ही पूर्णपणे विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच एकादशीचे व्रत सुरू करत असाल, तर आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात...

पहिल्यांदाच एकादशीचे व्रत सुरू करायचंय तर हा दिवस आहे सर्वात शुभ, जाणून घ्या तारीख
| Edited By: | Updated on: Nov 08, 2025 | 11:21 PM

आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये भगवान विष्णूंना समर्पित एकादशी व्रताला विशेष महत्त्व आहे. एकादशीचे व्रत महिन्यातून दोनदा केले जाते, त्यातील पहिली कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला आणि दुसरी म्हणजे शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे नाव आणि महत्त्व आहे. तसेच प्रत्येक महिन्याला येणाऱ्या एकादशीचे व्रत पाळल्याने वेगवेगळे फायदे होतात. जर तुम्हाला ही यंदा पहिल्यांदाच एकादशी व्रत-उपवास सुरू करायचा आहे पण शुभ दिवस समजत नाहीये कधी सुरू करावा,तर चिंता करू नका आजच्या लेखात आपण एकादशी व्रत कधी सुरू करायचा आणि तुम्ही किती व्रत पाळावेत ते जाणून घेऊयात.

एकादशीचे उपवास कधी सुरू करावे?

मार्गशीर्ष महिन्यात कृष्ण पक्ष तिथीला येणाऱ्या एकदशीला उत्पन्न एकादशी म्हणून ओळखले जाते. तर तुम्ही पहिल्यांदाच एकादशी व्रत-उपवास सुरू करायचे असल्यास या एकादशी पासून सुरूवात करावी. उत्पन्न एकादशीचा सर्वात शुभ आणि सर्वोत्तम दिवस आहे. पौराणिक मान्यतेनुसार एकादशी मातेचा जन्म उत्पन्न एकादशीच्या दिवशी झाला होता. तुम्ही कोणत्याही एकादशीला व्रत सुरू करू शकता, परंतु उत्पन्न एकादशीला सुरुवात करणे सर्वात शुभ मानले जाते.

उत्पन्न एकादशी 2025 कधी आहे?

कॅलेंडरनुसार, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील उत्पन्न एकादशी 15 नोव्हेंबर 2025 रोजी येते. एकादशीचे व्रत 15 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजून 49 मिनिटांनी ते 16 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 वाजून 37 मिनिटांपर्यंत आहे. त्यामुळे, एकादशीचे व्रत-उपवास 15 नोव्हेंबर रोजी सुरू करता येते. हा दिवस खूप शुभ आहे.

एकादशीचे व्रत कोणी करावे?

एकादशीचे व्रत कोणीही पाळू शकतात. भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी विवाहित, अविवाहित, मुले, विधवा, पुरुष आणि महिलांसह कोणीही हे व्रत करू शकते.

एकादशीचे किती व्रत करावेत?

एकादशीचे व्रत-उपवास हे वर्षातून 24 ते 26 वेळा केले जातात, ज्यामध्ये महिन्यातून दोनदा एकादशीचे व्रत पाळलेले जातात. धार्मिक मान्यतेनुसार, एकादशीचे व्रत किमान 5 ते 11 वर्षे पाळले पाहिजे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आयुष्यभर उपवास करू शकता. मात्र जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही किमान एक वर्ष उपवास करावा आणि नंतर उद्यापन (उपवासाचा शेवट) करावे.

एकादशीच्या उपवासाचे फायदे

धार्मिक मान्यतेनुसार एकादशी व्रत पापांचा नाश करते, मोक्ष प्रदान करते आणि घरात सुख आणि समृद्धी आणते. असे मानले जाते की एकादशी व्रत पाळल्याने समृद्धी येते, भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो, संपत्ती वाढते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात.

पहिल्यांदा एकादशीचे व्रत कसे सुरू करावे?

पहिल्यांदाच एकादशीचे व्रत सुरू करण्यासाठी या गोष्टी ठेवा लक्षात

– दशमीच्या संध्याकाळपासून सात्विक अन्न खा आणि रात्री जेवू नका.

– सकाळी लवकर उठा, आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा.

– हातात पाणी आणि फुले घ्या आणि म्हणा, “हे प्रभू, तुमच्या आशीर्वादाने मी एकादशीचे व्रत पाळण्याची प्रतिज्ञा करत आहे. कृपया मला हे व्रत पूर्ण करण्याची शक्ती द्या.”

– तुम्ही महिन्यातील दोन्ही एकादशी व्रत पाळाल की फक्त एकच व्रत पाळाल हे ठरवा.

– देवघरात देवांची पूजा केल्यावर दिवा लावा. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना गंगाजलाने अभिषेक करा आणि त्यांना फुले आणि तुळशीची पाने अर्पण करा.

– उपवासाच्या दिवसात तुम्ही फळे, दूध, दही, ताक, साबुदाणा किंवा उपवासाचे पदार्थ खाऊ शकता.

– एकादशीच्या उपवासात कांदा, लसूण, धान्ये आणि कडधान्ये टाळावीत.

– नैवेद्यातही सात्विक पदार्थांचा वापर करा, ज्यामध्ये तुळशीचा समावेश असावा.

– एकादशीच्या व्रत-उपवासामध्ये घर झाडू नका, जेणेकरून सूक्ष्मजीव मरणार नाहीत.

– एकादशीच्या व्रतामध्ये केस आणि नखे कापू नका.

– द्वादशी तिथीला गरजू व्यक्तीला अन्न आणि वस्तु दान करा.

– ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना जेवायला द्या.

– तुम्ही गंगाजल आणि तुळशीची पाने तोंडात घालून उपवास सोडू शकता.

लक्षात ठेवा:- अन्नाचा पहिला घास गाय, प्राणी, पक्षी किंवा कुटुंबातील सदस्यांना द्यावा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)