
ज्योतिषशास्त्राप्रमाणे, हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व असते. घरातील अनेक वस्तू बऱ्याच पद्धतीने परिणाम करत असतात. त्यामुळे त्या वस्तूंची दिशा किंवा त्यांची जागा हे सर्व पाहणे फार महत्त्वाचे मानले जाते. तसेच घरातील बेडरुम, हॉल, बाथरूम, किंचन या सर्व जागा वास्तूनुसार योग्य दिशेला असणे फार महत्त्वाचे असते. जर त्यांची दिशा चुकीची असेल तर त्याचे घरावर आणि परिणामी आयुष्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे घराचे दार.
घर बांधताना किंवा खरेदी करताना मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा?
घर बांधताना किंवा खरेदी करताना मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा हा प्रश्न बऱ्याच लोकांना असतो. कारण दरवाजा हा घराचा मुख्य भाग असतो. त्याच जागेवरून लक्ष्मी देवी घरात प्रवेश करते. मुख्य दरवाजातून सकारात्मक ऊर्जा वाहते. म्हणून, दरवाजाला योग्य दिशा असणे पार गरजेचे असते. आता प्रश्न असा आहे की, मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा?
योग्य दरवाजाची दिशा : वास्तूशास्त्रानुसार मुख्य दरवाजा हा ईशान्य किंवा पूर्व-पश्चिम दिशेला असणे शुभ मानले जाते. मुख्य दरवाजा खूप लहान किंवा खूप मोठा नसावा. असे मानले जाते की अशा घरात सुख आणि समृद्धी असते.
या गोष्टी दारासमोर ठेवू नका : मुख्य प्रवेशद्वाराजवळ कचरा, खडे, दगड इत्यादी असू नये. घाणेरडे पाणीही साचलेले नसावे. यामुळे घरात नकारात्मकता येते. मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवल्याने देवी लक्ष्मी आकर्षित होत. त्यामुळे दरवाजासमोरील आवार हा नेहमी स्वच्छ असावा याची काळजी नक्की घ्यावी.
दरवाजा कायम सजवलेला आणि आकर्षित ठेवा : घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी, मुख्य दरवाजा सजवावा. तुम्ही दारावर ओम किंवा स्वस्तिक देखील काढू शकता आणि धातू किंवा लाकडी नेमप्लेट लावू शकता. मोठ्या किंवा कर्कश आवाजाच्या बेल ऐवजी मऊ आवाजात असलेली डोअरबेल लावणे कधीही उत्तम.
डोअरमॅट वापरा : मुख्य दरवाजासमोर नेहमीच डोअरमॅट ठेवावाय ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर राहते. शिवाय, मुख्य दरवाजावर एक उंबरठा नक्कीच असावा. जो सकारात्मक ऊर्जा आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करतो.
मुख्य प्रवेशद्वारावर अंधार टाळा : वास्तुनुसार, मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणारा मार्ग अंधारात नसावा. कारण तो नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो, ज्यामुळे घरातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. म्हणून, प्रवेशद्वार नेहमीच चांगले प्रकाशमान असले पाहिजे. यामुळे समृद्धी येते.
दारासमोर दिवा लावा : दररोज संध्याकाळी दारासमोर दिवा लावण्यास विसरू नये. त्यामुळे देवी लक्ष्मीची तर कृपा राहतेच. पण घरात सकारात्मकता देखील येते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)