AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एलपीजीमुळे आयपीएल 2026 स्पर्धेवर संकट, बीसीसीआय लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता

अमेरिका-इस्राईल आणि इराण यांच्यात युद्ध पेटलं आहे. गेल्या 11 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. तसेच युद्ध लवकर शांत होईल अशी स्थिती दिसत नाही. त्यामुळे जगभरात इंधानाचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशा स्थितीत आयपीएल 2026 स्पर्धेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

एलपीजीमुळे आयपीएल 2026 स्पर्धेवर संकट, बीसीसीआय लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
एलपीजीमुळे आयपीएल 2026 स्पर्धेवर संकट, बीसीसीआय लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यताImage Credit source: TV9 Network
| Updated on: Mar 10, 2026 | 5:42 PM
Share

अमेरिका-इस्राईल आणि इराण युद्धाची झळ आता संपूर्ण जगाला बसताना दिसत आहे. या युद्धातून भारतही सुटलेला नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केलं आहे. यात इंधन पुरवठ्यातील अडचणींमुळे घरगुती आणि आवश्यक नसलेल्या क्षेत्रांसाठी एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य दिलं जाईल असं स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे पुढे काय होईल याची चिंता भासू लागली आहे. याचा परिणाम आयपीएल 2026 स्पर्धेवरही होण्याची शक्यता आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर स्पर्धेचं आयोजन करणं कठीण होईल. बीसीसीआय या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आयपीएल गर्व्हनिंग काउंसिलचे अध्यक्ष अरूण धुमल यांनी सांगितलं की, या प्रकरणाकडे गांभार्याने पाहिले जात आहे. धुमल द न्यू इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले की, ‘आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. या युद्धात दररोज नवीन घडामोडी घडत आहेत. त्यामुळे सध्या काहीही निश्चितपणे सांगता येत नाही. आयपीएल 2026 स्पर्धा पुढील काही दिवसात सुरू होणार आहे. त्यावेळची तीव्रता पाहून आम्ही निर्णय घेऊ.’

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर लगेचच आयपीएल 2026 स्पर्धेची तारीख जाहीर करण्यात आली. 28 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात होणार आहे.फ्रेंचायझींनी वेगवेगळ्या शहरात आधीपासून सराव शिबीर सुरू केले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचं शिबीर गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. राजस्थान रॉयल्सनेही सरावाला सुरूवात केली आहे. पण असं असूनही वेळापत्रक काही जाहीर केलेलं नाही. त्यात काही राज्यातील निवडणुकांमुळे आयपीएलचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच बाजूने बीसीसीआयला विचार करावा लागत आहे. अमेरिका-इस्राईल आणि इराण युद्ध लांबलं तर आयपीएलबाबत विचार करणं भाग पडणार आहे. त्याचा प्रभाव फक्त लीगवरच नाही तर इतर उद्योग धंदे, रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थावरही बसण्याची शक्यता आहे.

युद्धाचा सर्वाधिक परिणाम हा पेट्रोलियम आणि एलपीजी उत्पादनाच्या पुरवठ्यावर झाला आहे. बंगळुरु आणि चेन्नई येथील हॉटेल व्यावसायिक संघटनानी सांगितलं की, त्यांच्याकडे फक्त एक दोन दिवस पुरेल इतकाच साठा आहे. एलपीजीचा वापर मर्यादित करण्यासाठी हॉटेल्सने त्यांचा मेन्यू मर्यादित करण्यास सुरूवात केली आहे. इतकंच काय तर युद्धामुळे खेळाडूंना मायदेशी जाणंही कठीण असल्याचं दिसून आलं आहे. विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. टी20 वर्ल्डकप संपल्यानंतरही झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका संघांना भारतातून तात्काळ निघता आलं नव्हतं.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग