नवीन घरात ‘या’ वस्तूसोबत घेऊन जाताय, होईल मोठं नुसकान, जाणून घ्या कोणत्या आहेत ‘ज्या’ गोष्टी?
नवीन घर फक्त एक आनंद नसून एक भावना असते. पण नवीन घरात जाण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. काही वस्तू जुन्या घरात कधीच घेऊन जाऊ नये... जाणून घ्या कोणत्या आहेत 'त्या' गोष्टी

आपलं स्वतःचं एक सुंदर घर असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते… घर म्हणजे फक्त एक आनंद नसून, कधीच न विसरता येणारी भावना असते… पण जेव्हा आपण नवीन घरात प्रवेश करतो, तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. जेव्हा नवीन घर बांधलं जातं किंवा जेव्हा एखादं कुटुंब नवीन घरात राहायला जातं, तेव्हा संपूर्ण कुटुंब आनंदानं भरून जातं. हिंदू परंपरा आणि वास्तुशास्त्रानुसार, नवीन घरात जाणं म्हणजे केवळ जागेतील बदल नसून, ती नवीन ऊर्जा आणि नवीन जीवनाची सुरुवात असते. म्हणूनच नवीन घरात जाताना काही गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो.
नवीन घरात न आणण्यासारख्या गोष्टी
तुटलेल्या वस्तू : असं मानलं जातं की फुटलेली काच, फुटलेली भांडी, खराब झालेलं फर्निचर किंवा बिघडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. यामुळे आर्थिक नुकसान होते असं मानलं जातं. त्यामुळे, अशा वस्तू नवीन घरात आणू नयेत.
तुटलेली घड्याळे : घड्याळ हे काळाचं आणि प्रगतीचं प्रतीक आहे. घरात तुटलेलं किंवा बंद पडलेले घड्याळ ठेवणं हे जीवनातील अडथळ्यांचं लक्षण मानलं जातं. गरज भासल्यास त्याची दुरुस्ती करणं किंवा ते बदलणं उचित ठरतं.
जुना झाडू : वास्तुशास्त्रानुसार, झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं. असं मानलं जातं की जुन्या घरातून नवीन घरात झाडू आणल्याने नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे, नवीन झाडू वापरणे शुभ मानलं जातं.
फाटलेले कपडे, जुन्या चपला : असं मानलं जातं की, निरुपयोगी, फाटलेले कपडे किंवा खराब झालेले बूट नवीन घरात गरिबीची भावना वाढवतात. त्यामुळे फक्त चांगल्या स्थितीत असलेल्या आवश्यक वस्तूच सोबत आणणं उत्तम.
तुटलेल्या मूर्ती किंवा देवतांची चित्रे : तुटलेल्या मूर्ती किंवा देवतांची फोटो नवीन घरी आणू नयेत. परंपरेनुसार त्यांचं नदीत विसर्जन करावं किंवा मंदिरात अर्पण करावे, असा सल्ला दिला जातो.
अनावश्यक कचऱ्याच्या वस्तू : जुनी मासिके, निरुपयोगी यंत्रे आणि तुटलेली खेळणी यांसारखा कचरा घरात आणल्याने घरातील पसारा वाढू शकतो. स्वच्छ आणि व्यवस्थित घर सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते.
नवीन घरात जाण्यापूर्वी करण्यासारख्या शुभ गोष्टी
संपूर्ण घराची कसून स्वच्छता…
मुख्य दरवाजावर स्वस्तिक आणि ‘शुभ’ यांसारखी शुभ चिन्हे काढणं…
गृहप्रवेश पूजा आणि हवन आयोजित करणं…
असं मानलं जातं की गणेशाची पूजा केल्याने अडथळे दूर होतात.
घरात प्रथम आणण्यासारख्या शुभ वस्तू कोणत्या आहेत, ते जाणून घ्या… देवाचे फोटो किंवा मूर्ती, कलश, तांदूळ आणि शुद्ध पाणी घरात शांती, संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जा आणतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)