AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! महाविकास आघाडीच्या बैठकीला 24 आमदारांची दांडी, बड्या नेत्यांचाही समावेश

आज महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला तब्बल 24 आमदारांनी दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे. यातील काही आमदारांची नावेही समोर आली आहेत. यात काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे.

मोठी बातमी! महाविकास आघाडीच्या बैठकीला 24 आमदारांची दांडी, बड्या नेत्यांचाही समावेश
MVA MeetingImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 24, 2026 | 10:24 PM
Share

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून घडामोडींना वेग आला आहे. काहीच दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. अशातच आज महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला तब्बल 24 आमदारांनी दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे. यातील काही आमदारांची नावेही समोर आली आहेत. यात काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

24 आमदारांची दांडी

महाविकास आघाडीच्या एकूण 59 आमदारांपैकी 35 आमदार आजच्या बैठकीला उपस्थित होते. तर 24 आमदारांनी या बैठकीला दांडी मारली आहे. बैठकीला गैरहजर असणाऱ्या आमदारांमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, अमित देशमुख, रोहित पवार, अभिजीत पाटील, विकास ठाकरे, संदीप क्षीरसागर, जयंत पाटील या बड्या नेत्यांचा समावेश आहे. या आमदारांच्या अनुपस्थितीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

शरद पवार-जयंत पाटील गैरहजर

उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली. सुरुवातीला शरद पवार या बैठकीला हजर राहणार असल्याची माहिती समोर आली होती, मात्र शरद पवार आणि जयंत पाटील आपल्या वैयक्तिक कारणामुळे गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत अशी माहितीही समोर आली आहे.

या बड्या नेत्यांची हजेरी

समोर आलेल्या माहितीनुसार आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला संजय राऊत, अंबादास दानवे, बाळा नर, हरून खान, महेश सावंत, विकास ठाकरे, ज्योती गायकवाड, नितीन राऊत, आदित्य ठाकरे, वरून सरदेसाई यांच्यासह तब्बल 35 नेत्यांनी हजेरी लावली. शिवसेनेमधून सहा खासदार फुटल्यानंतर या बैठकीला वेगळं महत्त्व आले होते. या अधिवेशनामध्ये सरकारला कोणत्या विषयावरती घेरायचे. याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल